Ratan Tata Dainik Gomantak
अर्थविश्व

बाजारात येणार TATA च्या मालकीची आणखी एक सरकारी कंपनी

ओडिशा स्थित नीलाचल इस्पात निगम लिमिटेड टाटा समूहाच्या फर्मला सोपवण्याचे काम जुलैच्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमन्तक

ओडिशा स्थित नीलाचल इस्पात निगम लिमिटेड (NINL) टाटा समूहाच्या फर्मला सोपवण्याचे काम जुलैच्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. (Government approves Neelachal Ispat Nigam Ltd company owned by TATA will be launched in odisha)

Tata Steel Long Products (TSLP), टाटा स्टीलच्या युनिटने या वर्षी जानेवारीमध्ये NINL मधील 12,100 कोटी रुपयांच्या एंटरप्राइझ मूल्याने 93.71 टक्के भागभांडवल विकत घेण्यासंबंधीची बोली जिंकली होती. जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड, नलवा स्टील अँड पॉवर लिमिटेड आणि जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड यांच्या संघाला मागे टाकत कंपनीने हे यश मिळवले आहे.

व्यवहार अंतिम टप्प्यामध्ये आहे,

"व्यवहार अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत हस्तांतरण व्हायला हवे," असे एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले आहे. कंपनीमध्ये सरकारचा कोणताही हिस्सा नसल्यामुळे, विक्री सुरू होणार नाहीये. तिजोरीत जमा केले जातील आणि त्याऐवजी ओडिशा सरकारच्या चार CPSE आणि दोन PSU कडे जाणार आहेत.

इस्पात निगम लिमिटेडचा कलिंगनगर, ओडिशा येथे 1.1 मेट्रिक टन क्षमतेचा स्टील प्लांट आहे. ही सरकारी कंपनीही मोठ्या तोट्यात चालली असून 30 मार्च 2020 पासून हा प्लांट बंदच आहे. 31 मार्च 2021 पर्यंत कंपनीवर 6600 कोटी रुपयांची कर्जे आणि दायित्वे आहेत, ज्यात प्रवर्तकांचे 4116 कोटी रुपये, बँकांचे 1741 कोटी रुपये, इतर कर्जदार तसेच कर्मचाऱ्यांची मोठी देणी यांचा देखील समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budh Gochar 2026: 15 फेब्रुवारीपासून 'या' 3 राशींवर होणार धनवर्षा, ग्रहांच्या राजकुमाराची बदलणार चाल; संपणार घरातील कटकटी

Kushavati: गोव्यातला महाकाय भग्न नंदी, शिवालयाचे भग्नावशेष, शेकडो वर्षांच्या इतिहासाचा कोट; 'कुशावती' नदीकाठी वसलेली संस्कृती

इम्रान खान यांचं समर्थन करणं पडलं महागात! पाकिस्तानात 4 पत्रकारांसह 8 जणांना जन्मठेपेची शिक्षा; सोशल मीडिया पोस्ट ठरली गुन्हा

Viral Video: रात्रीचं दाट धुकं अन् समोरचं काहीच दिसेना, ड्रायव्हरनं लढवली अशी शक्कल की तुम्हीही म्हणाल 'नादच खुळा'! पाहा व्हिडिओ

Assonora Accident: अस्नोडा येथे बस आणि दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT