Google  Dainik Gomantak
अर्थविश्व

Gmail लॉगिनसाठी SMS कोड बंद! आता येणार नवीन QR कोड सिस्टिम

Google QR Code: जीमेल पासवर्ड विसरल्यानंतर लोक ओटीपीद्वारे त्यांचा पासवर्ड रीसेट करतात. पण आता गुगल ही ओटीपी सिस्टीम बंद करणार आहे.

Manish Jadhav

Google to Replace Gmail OTP with QR Code Verification for Enhanced Security

जर तुम्ही जीमेल वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. असे अनेक वेळा दिसून आले आहे की, जीमेल पासवर्ड विसरल्यानंतर लोक ओटीपीद्वारे त्यांचा पासवर्ड रीसेट करतात. पण आता गुगल ही ओटीपी सिस्टीम बंद करणार आहे. खरंतर, गुगल आता क्यूआर कोड बेस्ड वेरिफाई सिस्टिम घेऊन येत आहे. एसएमएसद्वारे पाठवले जाणारे सहा-अंकी कोड फिशिंग हल्ल्यांमुळे आणि सिम-स्वॅपिंगसारख्या फसव्या तंत्रांमुळे प्रभावित होऊ शकतात, त्यामुळे सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने हा बदल करण्यात येत आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, ही नवीन सिस्टिम येत्या काही महिन्यांत लागू केली जाईल.

जीमेलने पुष्टी केली

जीमेलचे प्रवक्ते रॉस रिचेंडरफर यांनी या नवीन सिस्टिमची पुष्टी केली आहे. याशिवाय, त्यांनी सांगितले की, आता वापरकर्त्यांना त्यांच्या फोन नंबरवर कोड मिळण्याऐवजी स्क्रीनवर एक QR कोड दिसेल, जो त्यांना त्यांच्या फोनच्या कॅमेरा ॲपने स्कॅन करावा लागेल. ही प्रक्रिया केवळ सोपीच नाही तर सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अधिक प्रभावी असेल.

SMS बेस्ड वेरिफिकेशन सुरक्षित का नाही?

आतापर्यंत गुगल एसएमएसद्वारे कोड पाठवून वापरकर्त्यांचे अकाऊंट वेरिफाई करत असे. तथापि, या संपूर्ण प्रक्रियेत अनेक त्रुटी आढळून आल्या. सायबर गुन्हेगार फिशिंग तंत्रांचा वापर करुन वापरकर्त्यांना त्यांचे कोड मिळवण्यासाठी फसवू शकतात. सिम-स्वॅपिंग हल्ल्यांद्वारे, ते एखाद्याच्या मोबाईल नंबरवर नियंत्रण मिळवू शकतात आणि त्यांचे जीमेल अकाऊंट ॲक्सेस करु शकतात. गुगलला (Google) असे आढळून आले की, हॅकर्सकडून फ्रॉडसाठी एसएमएस आधारित पडताळणीचा वापर केला जात आहे. याला 'ट्रॅफिक पंपिंग' किंवा 'टोल फ्रॉड' म्हणतात, ज्यामध्ये सायबर गुन्हेगार बनावट नंबरवर व्हेरिफिकेशन कोड पाठवून पैसे कमवतात. हे लक्षात घेऊन, गुगलने आता ही नवीन सिस्टिम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

क्यूआर कोड अधिक सुरक्षित होणार

क्यूआर कोड तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने सुरक्षिततेत मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल. ही सिस्टिम वापरकर्त्यांना आणि गुगलला थेट जोडते, ज्यामुळे दरम्यानची फसवणूक टाळण्यास मदत होणार आहे. याचा अर्थ असा की, फिशिंग हल्ले आणि सिम-स्वॅपिंगसारखे धोके जवळजवळ संपुष्टात येतील कारण चोरीला जाऊ शकणारे कोणतेही कोड शेअर करण्याची आवश्यकता राहणार नाही.

गुगलने या बदलामागील हेतू स्पष्ट करताना सांगितले की, एसएमएस कोड वापरकर्त्यांसाठी सुरक्षा धोका निर्माण करतात आणि कंपनी वापरकर्त्यांना सायबर धोक्यांपासून वाचवण्यासाठी त्यांच्या सुरक्षा उपायांमध्ये सतत सुधारणा करत आहे. तथापि, अद्याप क्यूआर कोड सिस्टिमच्या लाँचची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु गुगलने लवकरच त्यावर अधिक अपडेट्स दिले जातील असे संकेत दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025 Schedule: प्रतीक्षा संपली! 'आशिया कप'चं वेळापत्रक जाहीर, 'या' दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT