google issues warning for billions of chrome users  Dainik Gomantak
अर्थविश्व

लाखो क्रोम वापरकर्ते अडचणीत! गुगलने दिला इशारा

दैनिक गोमन्तक

गुगल क्रोम हा अतिशय लोकप्रिय इंटरनेट ब्राउझर आहे. जगभरात त्याचे अब्जावधी वापरकर्ते आहेत. आता गुगलने क्रोम वापरकर्त्यांसाठी इशारा जारी केला आहे. गुगल क्रोममध्ये एक नवीन त्रुटी आढळली आहे. यामुळे Google Chrome चे 320 दशलक्ष वापरकर्ते धोक्यात आले आहेत. (google issues warning for billions of chrome users)

गुगल क्रोममध्ये एक नवीन हॅक आढळला आहे. हे एका नवीन क्रोम ब्लॉग पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे. क्रोमच्या सुरक्षेचा भंग करून हॅकर्स वापरकर्त्यांना लक्ष्य करू शकतात, असा इशारा गुगलने दिला आहे. कंपनीने त्याचे निराकरण जारी केले आहे.

विंडोज, मॅकओएस, लिनक्स आणि अँड्रॉइड (Android) सारख्या सर्व प्रमुख क्रोम प्लॅटफॉर्मसाठी हा दोष आढळला आहे. क्रोम वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी, गुगलने अद्याप या धोक्याची तपशीलवार माहिती दिलेली नाही. क्रोमच्या V8 घटकाचा हॅक होण्याची तीन आठवड्यांतील ही दुसरी वेळ आहे.

या त्रुटीचा सामना करण्यासाठी, Google ने Chrome चा नवीन अॅप (100.0.4896.127) जारी केली आहे. परंतु, हे ताबडतोब सर्वांना उपलब्ध होणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. अपडेट्स मॅन्युअली तपासण्यासाठी वापरकर्ते Chrome च्या वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन-डॉट मेनूवर क्लिक करू शकतात. यानंतर यूजर्सला सेटिंगमध्ये जावे लागेल. सेटिंग्जमध्ये गेल्यानंतर, तुम्हाला हेल्प विभागात जावे लागेल. त्यानंतर Google Chrome बद्दल टॅप करा. हे केल्यानंतर तुमचा ब्राउझर रीस्टार्ट करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोवा काँग्रेसच्या प्रभारी सचिवांचा बैठकांचा धडाका; 'त्या' आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन

Sunburn Festival 2024: त्यांनी कॅप्टनसारखे वागावे, बिनबुडाची विधाने करू नये; ‘सनबर्न’ याचिकेवरुन खंवटेंचे प्रत्त्युत्तर

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

SCROLL FOR NEXT