Vaishno Devi New Train Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railways: वैष्णोदेवीला जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वेने दिली खूशखबर, उद्यापासून लागू होणार 'हा' नवा नियम

Railways Rules: हापा-श्री माता वैष्णोदेवी कटरा सुपरफास्ट एक्स्प्रेस जामनगर (गुजरात) येथील हापा रेल्वे स्थानकावरुन पहाटे 5.25 वाजता सुटेल.

Manish Jadhav

Vaishno Devi New Train: उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. अशा परिस्थितीत वैष्णोदेवीला जाणाऱ्यांची संख्याही मोठ्याप्रमाणात वाढली आहे. तुम्हीही दरवर्षी माता वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

होय, भाविकांची वाढती गर्दी पाहता रेल्वेने नवा निर्णय घेतला आहे. या बदलानंतर हजारो प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

भक्तांची सोय लक्षात घेऊन रेल्वेने सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर भवानी मंडी रेल्वे स्थानकावर दोन गाड्या थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्विट करुन अधिकृत घोषणा करण्यात आली

डीआरएम वडोदरा यांच्याकडून ट्विट करुन अधिकृत घोषणा करण्यात आली. डीआरएम वडोदरा यांच्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, हापा-श्री माता वैष्णो देवी कटरा सुपरफास्ट एक्स्प्रेस (12475) सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर भवानी मंडी येथे थांबेल.

ट्रेनचा हा थांबा दररोज असेल आणि 16 मे 2023 ते 12 नोव्हेंबर 2023 पर्यंत ही ट्रेन रात्री 10.03 वाजता भवानी मंडीला पोहोचेल. येथे दोन मिनिटांचा थांबा असेल आणि सकाळी 10.05 वाजता स्थानकातून निघेल.

परतीच्या ट्रेनची वेळ

त्या बदल्यात ही ट्रेन भवानी मंडी येथे 16 मे 2023 ते 12 नोव्हेंबर 2023 पर्यंत थांबेल. श्री माता वैष्णो देवी कटरा - हापा सुपरफास्ट एक्स्प्रेस (12476) दुपारी 3.58 वाजता भवानी मंडी येथे पोहोचेल. दोन मिनिटांच्या थांब्यानंतर ही गाडी दुपारी चार वाजता गंतव्यस्थानासाठी रवाना होईल.

दोन्ही गाड्यांचे मार्ग

हापा-श्री माता वैष्णोदेवी कटरा सुपरफास्ट एक्स्प्रेस जामनगर (गुजरात) येथील हापा रेल्वे स्थानकावरुन पहाटे 5.25 वाजता सुटेल.

ही ट्रेन राजकोट रेल्वे स्टेशन, वांकानेर जंक्शन, सुरेंद्रनगर जंक्शन रेल्वे स्टेशन, विरमगाम जंक्शन, अहमदाबाद (Ahmedabad) रेल्वे स्टेशन, नडियाद जंक्शन, आनंद जंक्शन, वडोदरा जंक्शन रेल्वे स्टेशन, गोधरा, दाहोद, मेघनगर, रतलाम, नागदा, विक्रमगढ, रामनगर, शामनगर येथे थांबते.

मंडी जंक्शन, कोटा जंक्शन, सवाई माधोपूर जंक्शन थांबे. ही ट्रेन दिल्लीचे हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन, नवी दिल्ली (New Delhi) रेल्वे स्टेशन, पानिपत, अंबाला, लुधियाना, जालंधर कॅंट, पठाणकोट कॅन्टोन्मेंट, कठुआ, जम्मू तवी रेल्वे स्टेशन, उधमपूर मार्गे माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानकावर पोहोचते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Corlim Accident: ऐन दिवाळीत कोसळला दुःखाचा डोंगर! भरधाव गाडीने दिली पादचाऱ्याला धडक; 39 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

Bhai Dooj 2025: '7 रंगांचे तिलक, न कोमेजणारा हार'; नेपाळमध्ये कशी साजरी होते भाऊबीज? जाणून घ्या आगळीवेगळी प्रथा..

Horoscope: आर्थिक लाभाची शक्यता आहे, पण खर्चही वाढतील; घरातील पूजनात सहभागी व्हा

Asrani Death: हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं! प्रसिद्ध डायलॉग मागील आवाज कायमचा शांत झाला; अभिनेते असरानींचे निधन

स्वप्नपूर्ती! फक्त 60 रूपयांत स्टेडियममधून पाहा टीम इंडियाचा कसोटी सामना, ऑफर कधी आणि कशी मिळेल? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT