IPO Dainik Gomantak
अर्थविश्व

पुढील आठवड्यात 4 IPO मध्ये पैसे लावण्याची संधी, जाणून घ्या कशावर खेळायचा डाव

IPO's In Next Week: नवीन वर्षात अनेक कंपन्यांचे आयपीओ आले आहेत. अनेकांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले तर काहींनी निराशही केले.

Ashutosh Masgaunde

Good news for IPO investors, IPO of 4 companies will start next week:

IPO गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 4 कंपन्यांचा IPO पुढील आठवड्यात म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत.

नवीन वर्षात अनेक कंपन्यांचे आयपीओ आले आहेत. अनेकांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले तर काहींनी निराशही केले.

आता पुढील आठवड्यातही काही कंपन्यांचे IPO येत आहेत आणि कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. याशिवाय पुढील आठवड्यात कोणत्या कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होतील याचीही माहिती घेऊया.

पुढील आठवड्यात येणारे 4 IPO

विभोर स्टील ट्यूब्स

विभोर स्टील ट्यूब्सचा IPO 13 फेब्रुवारी 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल आणि गुंतवणूकदार 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत या IPO मध्ये पैसे गुंतवू शकतील.

हा IPO 72.17 कोटी रुपयांचा बुक बिल्ट इश्यू आहे आणि पूर्णपणे नवीन इश्यू आहे. विभोर स्टील ट्यूब्स IPO चा प्राइस बँड 141 ते ₹151 प्रति शेअर सेट केला आहे.

वाईज ट्रॅव्हल इंडिया

WTI Cabs चा IPO 12 फेब्रुवारी 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 14 फेब्रुवारी रोजी बंद होईल.

WTI Cabs IPO चा प्राइस बँड 140 ते 147 रुपये प्रति शेअर सेट केला आहे. शेअर इंडिया कॅपिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत, तर बीटल फायनान्शियल अँड कॉम्प्युटर सर्व्हिसेस (पी) लिमिटेड या इश्यूचे रजिस्ट्रार आहेत.

थाई कास्टिंग

थाई कास्टिंगचा IPO 15 फेब्रुवारी 2024 रोजी गुंतवणुकीसाठी उघडेल आणि 19 फेब्रुवारी 2024 रोजी बंद होईल.

या IPO चा प्राइस बँड अजून जाहीर झालेला नाही. GYR कॅपिटल ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत, तर पूर्वा शेअररेजिस्ट्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या इश्यूचे रजिस्ट्रार आहेत.

कलहृधन ट्रेंडझ IPO

Kalaharidhan Trendz चा IPO 15 फेब्रुवारी 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 20 फेब्रुवारी रोजी बंद होईल.

Kalaharidhaan Trendz IPO ची किंमत 45 रुपये प्रति शेअर आहे. इंटरएक्टिव्ह फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर आहे, तर बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या इश्यूचे रजिस्ट्रार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT