Gautam Adani Crisis
Gautam Adani Crisis Dainik Gomantak
अर्थविश्व

Adani Group Crisis: अदानी समूहासाठी आनंदाची बातमी, 'या' एजन्सीने सांगितली मोठी गोष्ट

दैनिक गोमन्तक

Fitch Ratings On Adani Group: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये प्रचंड चढ-उतार होत असताना, समूहासाठी एक दिलासादायक बातमी आली आहे.

होय, अदानी समूहावर फसवणूक केल्याचा आरोप करणाऱ्या 'शॉर्ट सेलर'च्या अहवालानंतर, समूह कंपन्यांच्या रेटिंगवर आणि त्यांच्या सुरक्षेवर सध्यातरी कोणताही परिणाम होणार नाही, असे फिच रेटिंग्जच्या वतीने शुक्रवारी सांगण्यात आले आहे.

अमेरिकन कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूहावर 'ओपन स्टॉक मॅनिपुलेशन आणि अकाउंटिंग फ्रॉड'मध्ये गुंतल्याचा आरोप केला आहे.

कंपन्यांच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण

कंपनीने केलेल्या या आरोपांनंतर समूह कंपन्यांचे शेअर्स सातत्याने घसरत आहेत. रेटिंग एजन्सीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अदानी समूहाच्या अंदाजित रोखीच्या प्रवाहात कोणताही मोठा बदल होणार नाही, अशी अपेक्षा आहे. फिच रेटिंग्सच्या विधानानंतर अदानी समूहाच्या शेअर्सची (Shares) घसरण थोडी थांबू शकते.

NSE चा अदानी ग्रुपवर मोठा निर्णय

याआधी, शुक्रवारी NSE ने अदानी ग्रुपवर मोठा निर्णय घेतला. शेअर्समधील प्रचंड चढउतार थांबवण्यासाठी NSE ने हा निर्णय घेतला.

NSE ने अदानी पोर्टच्या F&O स्टॉक खरेदीवर बंदी घातली आहे. अदानी पोर्ट आणि एंटरप्रायजेस सर्विलान्सवर आहे. अदानी समूहाच्या (Adani Group) तीन कंपन्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

दुसरीकडे, न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजनेही अदानी एंटरप्रायझेस डीलिस्ट करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकन शेअर बाजाराने जारी केलेल्या नोटनुसार अदानी एंटरप्रायझेसला डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून काढून टाकले जाईल.

अदानी एंटरप्रायझेसबाबत ही कारवाई स्टॉक मॅनिपुलेशन आणि अकाउंटिंग फ्रॉडच्या आरोपांचे विश्लेषण केल्यानंतर करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Gas Leakage: गॅस बंद न करता झोपी गेले; वास्कोत गुदमरुन वाराणसीच्या एकाचा मृत्यू, तिघे अत्यवस्थ

Netravali: नेत्रावळीत शिकार पार्टीचे नियोजन भोवले; कदंबच्या 16 कर्मचाऱ्यांना काडतूससह रंगेहाथ पकडले

तेलंगणात 2.07 कोटी गोवा बनावटीचे मद्य जप्त; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेशात दारु तस्करी

UP Crime: गर्लफ्रेन्डचे गोव्याला जाण्याचे स्वप्न पूर्ण करणं आलं अंगलट; सहा महिने वाचवलेले पैसे पाण्यात

Nuvem Accident : नुवेत कारच्या धडकेने दुचाकीस्‍वाराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT