Gold Silver Rate Dainik Gomantak
अर्थविश्व

Gold Silver Rate: गुंतवणूकदारांची चंगळ, तर सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी! सोन्या-चांदीच्या दरात एकाच दिवसात 'इतक्या' हजारांची वाढ

Today Gold Silver Rate: भारतीय सराफा बाजारात आज (27 फेब्रुवारी) पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून सोन्या-चांदीच्या किमतींनी नवीन उच्चांक गाठले.

Manish Jadhav

Gold-Silver Price : भारतीय सराफा बाजारात आज (27 फेब्रुवारी) पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून सोन्या-चांदीच्या किमतींनी नवीन उच्चांक गाठले. आज 27 फेब्रुवारी 2026 रोजी मार्केट ओपन होताच गुंतवणुकीचा ओघ वाढल्याने मौल्यवान धातूंच्या दरात मोठी तेजी दिसून आली.

जागतिक स्तरावरील अनिश्चितता आणि भू-राजकीय तणावाचा थेट परिणाम घरगुती बाजारावर झाला. विशेषतः मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज दुपारी 12 वाजेपर्यंत सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममागे सुमारे 690 रुपयांची वाढ झाली असून सोने चक्क 1,60,399 रुपयांच्या स्तरावर पोहोचले. केवळ सोनेच नाही, तर चांदीनेही गुंतवणूकदारांना मोठा झटका दिला. चांदीच्या दरात एकाच दिवसात 8,311 रुपयांची प्रचंड वाढ झाली असून ती 2,67,980 रुपये प्रति किलो या विक्रमी पातळीवर व्यवहार करत आहे.

या भाववाढीमागे मुख्यत्वे तीन मोठी आंतरराष्ट्रीय कारणे असल्याचे बाजार तज्ज्ञांचे मत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता भू-राजकीय तणाव आणि अणुचाचणी चर्चांमधील अनिश्चितता यामुळे जागतिक गुंतवणूकदार शेअर बाजारापेक्षा सोन्यासारख्या सुरक्षित पर्यायाकडे वळले आहेत. तसेच, अमेरिकेची नवीन व्यापार धोरणे आणि आयात शुल्काबाबत असलेला गोंधळ यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची (Gold) मागणी झपाट्याने वाढली आहे. डॉलरच्या मूल्यातील चढ-उतार आणि स्थानिक पातळीवर वाढलेली मागणी या घटकांनीही सोन्या-चांदीच्या दरवाढीला मोठा आधार दिला आहे.

सध्याच्या या अस्थिर बाजारपेठेत गुंतवणूकदार (Investors) आणि सामान्य खरेदीदारांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. जर तुम्ही केवळ दागिन्यांच्या उद्देशाने सोने खरेदी करणार असाल, तर बाजारातील ही प्रचंड तेजी पाहता सध्या थोडा वेळ वाट पाहणे किंवा छोट्या तुकड्यांमध्ये खरेदी करणे शहाणपणाचे ठरु शकते. दुसरीकडे, ज्या गुंतवणूकदारांनी सोन्याचे दर कमी असताना गुंतवणूक केली होती, त्यांच्यासाठी ही वेळ नफा कमावण्याची चांगली संधी असू शकते. एकूणच, जागतिक परिस्थिती जोपर्यंत निवळत नाही, तोपर्यंत बाजारातील ही चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT