Gold Price DainiK Gomantak
अर्थविश्व

Gold Price Hike: शेअर बाजार पडला, पण सोन्याने घेतली उसळी, एका महिन्यात तब्बल 'इतक्या' हजारांची वाढ; आता सप्टेंबरमध्ये होणार नवा रेकॉर्ड?

Stock Market vs Gold Price: भारतीय शेअर बाजार आणि सोन्याचे दर नेहमीच एकमेकांच्या विरुद्ध राहतात, असे म्हटले जाते.

Manish Jadhav

Stock Market vs Gold Price: भारतीय शेअर बाजार आणि सोन्याचे दर नेहमीच एकमेकांच्या विरुद्ध राहतात, असे म्हटले जाते. जेव्हा शेअर बाजारात तेजी असते, तेव्हा सोन्याचे दर स्थिर राहतात किंवा कमी होतात. याउलट, जेव्हा शेअर बाजारात मोठी घसरण होते, तेव्हा सोन्याच्या दरात अनेकदा वाढ होताना दिसते. ऑगस्ट 2025 मध्येही असाच काहीसा अनुभव आला. भारतीय शेअर बाजारात सुमारे 1.50 टक्के घट झाली, तर सोन्याच्या (Gold) दराने विक्रमी वाढ नोंदवली. चला तर मग जाणून घेऊया एका महिन्यात सोन्याचा दर किती हजारांनी वाढला आणि सप्टेंबरमध्ये सोन्याचे दर कसे राहू शकतात?

शेअर बाजारात मोठी घसरण

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात भारतीय शेअर बाजारात (Stock Market) मोठी घसरण पाहायला मिळाली. या महिन्यात बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स सुमारे 1,375.93 अंकांनी घसरुन 79,809.65 वर आला. त्याचप्रमाणे, निफ्टी मध्येही सुमारे 1.38 टक्क्यांनी घट होऊन तो 24,426.85 अंकांवर बंद झाला. या घसरणीचे एक मुख्य कारण म्हणजे विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून आपला पैसा काढणे सुरुच ठेवले. ऑगस्टमध्ये त्यांनी बाजारातून तब्बल 34,993 कोटी रुपये काढून घेतले, ज्यामुळे बाजारावर आणखी दबाव आला.

दुसरीकडे, ही घसरण सोन्याच्या किमतींसाठी मात्र फायदेशीर ठरली, कारण जेव्हा शेअर बाजारात अनिश्चितता असते, तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांकडे वळतात आणि त्यांच्यासाठी सोने हा एक उत्तम पर्याय असतो.

सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ

गेल्या एका महिन्यात फ्युचर्स मार्केटमध्ये (MCX) सोन्याच्या किमतीत मोठी वाढ दिसून आली. 31 जुलै 2025 रोजी, 3 ऑक्टोबर 2025 रोजी मुदत संपणाऱ्या सोन्याच्या कराराची किंमत 98,769 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. तर महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी, 29 ऑगस्ट 2025 रोजी या कराराची किंमत 1,03,824 रुपये होती. याचा अर्थ, एका महिन्यातच सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 5,055 रुपयांची मोठी वाढ झाली. ही वाढ सोन्याच्या इतिहासातील एक मोठी वाढ मानली जात आहे.

सप्टेंबरमध्येही सोन्याची चमक कायम राहणार?

तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या दरात सप्टेंबर महिन्यातही तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. कारण, ज्या घटकांमुळे सोन्याच्या दराला आधार मिळाला, ते घटक अजूनही कायम आहेत आणि त्यात लवकर घट होण्याची शक्यता नाही. जागतिक पातळीवरील आर्थिक धोरणांमुळे संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता निर्माण झाली आहे. याशिवाय, जागतिक तणाव अजूनही कमी झालेला नाही. तसेच, भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत आपल्या सार्वकालिक नीचांकी पातळीजवळ व्यापार करत आहे. या सर्व घटकांमुळे गुंतवणूकदार अजूनही सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांच्या शोधात आहेत. त्यामुळे, येणाऱ्या महिन्यातही सोन्याच्या किमतीला चांगला आधार मिळण्याची शक्यता असून सोन्याच्या दरात आणखी वाढ दिसू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'आनंदाचा क्षण दुःखात बदलला'! विराट कोहलीची X पोस्ट; दुर्दैवी घटनेबद्दल केला शोक व्यक्त

Panaji: चारवेळा ओके म्हणाला, पाचव्यांदा नाही मिळाला रिस्पॉन्स; कॅसिनो स्वच्छ करण्यासाठी पाण्यात उतरलेल्या डायव्हरचा मृत्यू

Vasco: रस्त्यांवर जुनी वाहने, विक्रेते; 'वास्को'तील अतिक्रमणे हटणार कधी? नागरिकांचा संतप्त सवाल

Rivona: 2 भावांचा दुर्दैवी मृत्यू! 'ते' कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडू नये याची काळजी घ्या; आमदार सिल्वांची मागणी

Goa Live Updates:गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष म्हणून डॉ. लेविन्‍सन मार्टिन्स नियुक्त

SCROLL FOR NEXT