Gold Rate Dainik Gomantak
अर्थविश्व

Gold Rate Today: सोन्याची झळाळी झाली कमी! किमतीत 'एवढ्या' हजारांची घसरण; जाणून घ्या दर अन् कारण

Gold price Drop April 2025: गेल्या काही महिन्यात सोन्याची किमतींनी गगनभरारी घेतली. मात्र आता सोन्याच्या किमतीत घसरण होत चालली आहे. सोने आता प्रति 10 ग्रॅम 6658 रुपयांनी स्वस्त झाले. शुक्रवारी एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 92,700 रुपये होती.

Manish Jadhav

Gold Rate Today: गेल्या काही महिन्यात सोन्याची किमतींनी गगनभरारी घेतली. मात्र आता सोन्याच्या किमतीत घसरण होत चालली आहे. सोने आता प्रति 10 ग्रॅम 6658 रुपयांनी स्वस्त झाले. सोन्याच्या किमतीतील घसरणी मागे कारण अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या व्यापार युद्धाचा भडका कमी झाल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारी एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 92,700 रुपये होती. जे प्रति 10 ग्रॅम 99,358 रुपयांच्या विक्रमी उच्चांकापेक्षा 6658 रुपये स्वस्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस 3240.88 रुपयांवर बंद झाला. त्याचवेळी, कॉमेक्स गोल्ड प्रति औंस 3257 रुपयांवर बंद झाला.

तज्ञ काय म्हणत आहेत?

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध थंडावल्याने तसेच अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. 98च्या पातळीवर पोहोचल्यानंतर अमेरिकन डॉलर निर्देशांक पुन्हा एकदा भरारी घेण्यात यशस्वी झाला. वृत्तानुसार, अमेरिका चीनवर लादलेले शुल्क कमी करु शकते. अशा बातम्या समोर आल्यानंतर डॉलर मजबूत होत आहे. त्याचवेळी, सोन्याच्या (Gold) किमतीतील तेजीला हा एक धक्का मानला जात आहे.

एलकेपी सिक्युरिटीजचे जतिन त्रिवेदी यांनी सांगितले की, "अनिश्चिततेच्या काळात सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 92000 ते 94500 रुपयांच्या दरम्यान असू शकते." त्याचवेळी, वेल्थस्ट्रीटच्या सुगंधा सचदेवा यांनी सांगितले की, "अमेरिका (America) आणि चीनमधील सुरु असलेल्या व्यापार युद्ध थंडावत आहे. परंतु अनिश्चिततेमुळे ही एक सुरक्षित गुंतवणूक राहील. सध्याच्या बाजार परिस्थितीत, सोन्याच्या दराला 91,700 रुपयांच्या पातळीवर आधार मिळत आहे. त्याचवेळी, तो 96500 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर रेसिसटंस करत आहे."

दिल्लीत सोन्याचा दर- प्रति 10 ग्रॅम 92650 रुपये आहे.

मुंबईत सोन्याचा दर- प्रति 10 ग्रॅम 92,८810 रुपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT