Gold Market Value Dainik Gomantak
अर्थविश्व

Gold Market Value: "युद्धामुळं सोनं झालं पॉवरफुल''! 35 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचलं बाजारमूल्य; भारत आणि ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेलाही सोडलं मागं

Iran-Israel War Gold Impact: मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या भडक्याने जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी खळबळ उडाली.

Manish Jadhav

Global Gold Market : मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या भडक्याने जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी खळबळ उडाली. या युद्धाच्या सावटाखाली गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे धाव घेतल्याने सोन्याच्या बाजारमूल्याने (Market Value) 30 ते 35 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार केला. विशेष म्हणजे, सोन्याची ही 'मार्केट व्हॅल्यू' आता भारत आणि युनायटेड किंगडम (UK) या दोन मोठ्या देशांच्या एकत्रित एकूण देशांतर्गत उत्पादनापेक्षा (GDP) कित्येक पटीने मोठी झाली. जिथे भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि ब्रिटनची अर्थव्यवस्था 3 ट्रिलियन डॉलर्सच्या आसपास आहे, तिथे सोन्याने 35 ट्रिलियन डॉलर्सचा डोंगर उभा करुन जगाला थक्क केले.

इराणमधील (Iran) लष्करी तळांवर झालेले हल्ले आणि त्यानंतर तेहरानकडून मिळालेले प्रत्युत्तर यामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती प्रति औंस 5,400 डॉलर्सच्या वर गेल्या असून त्या 5,600 डॉलर्स या विक्रमी पातळीला स्पर्श करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय बँकांकडून होणारी सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी आणि कोरोनानंतरची वाढती महागाई यामुळे सोन्याचे भाव आधीच तेजीत होते, त्यात आता या युद्धाने आगीत तेल ओतण्याचे काम केले. सोन्याने गेल्या 13 वर्षांचा आपला रेकॉर्ड मोडीत काढला असून तज्ज्ञांच्या मते हा प्रवास 1972 आणि 2005 प्रमाणे पुढील 6 ते 8 वर्षे सुरु राहू शकतो.

सध्याच्या परिस्थितीत सोन्याने 'फायनान्शिअल सुपरपॉवर'चे रुप धारण केले आहे. खाडी देशांतील क्षेपणास्त्र हल्ले, 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ' बंद होण्याच्या धमक्या आणि ऊर्जा प्रकल्पांवर होणारे संभाव्य हल्ले यांमुळे शेअर बाजार कोसळत असताना सोन्याची झळाळी मात्र अधिकच वाढत आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे जेव्हा जेव्हा कागदी चलनावरचा विश्वास उडतो, तेव्हा जगभरातील गुंतवणूकदार 'सोने' (Gold) या सर्वात जुन्या आणि विश्वासार्ह मालमत्तेकडे वळतात. 35 ट्रिलियन डॉलर्सची ही प्रचंड संपत्ती कोणत्याही कारखान्याशिवाय, कामगारांशिवाय आणि निवडणुकांशिवाय केवळ मानवी भीती आणि अनिश्चिततेच्या जोरावर उभी राहिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT