Gold Silver Price Drop Dainik Gomantak
अर्थविश्व

Gold Silver Price Drop: ग्राहकांसाठी खूशखबर! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, भाव थेट गेल्या एका वर्षातील नीचांकी पातळीवर

Gold And Silver Price Crash Mcx Market: सोने-चांदी खरेदी करण्याची वाट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली.

Manish Jadhav

Gold And Silver Price Crash Mcx Market: सोने-चांदी खरेदी करण्याची वाट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली. कमोडिटी मार्केटमध्ये शुक्रवारी रात्री सोने-चांदीच्या किमती थेट गेल्या 12 महिन्यांतील म्हणजेच एका वर्षाच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर एकाच झटक्यात चांदी तब्बल 10 हजार रुपयांपेक्षा अधिक प्रति किलोने स्वस्त झाली, तर सोन्याच्या दरातही प्रति 10 ग्रॅममागे 4 हजार रुपयांपेक्षा जास्त मोठी घसरण नोंदवल गेली.

शुक्रवारी रात्री जवळपास 8 वाजता बाजाराचे चित्र अचानक पालटले आणि बाजारात विक्रीचा मोठा दबाव दिसून आला. एमसीएक्सवर डिसेंबर फ्युचरची चांदी सुमारे 5 टक्क्यांनी घसरुन थेट 1,78,900 ते 1,79,000 रुपये प्रति किलोच्या दरम्यान आली. तसेच, सोन्याचा भाव 3 टक्क्यांनी घसरुण 1,38,250 ते 1,38,400 रुपये प्रति 10 ग्रॅम पातळीवर आला.

सध्याच्या सराफा बाजारानुसार, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा (Gold) भाव 1,40,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर दागिन्यांसाठी वापरले जाणारे 22 कॅरेट सोने 1,28,000 रुपयांवर आले. याशिवाय, 18 कॅरेट सोने 1,05,000 रुपये आणि 999 शुद्धतेची चांदी 1,81,344 रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेड करत आहे.

किमतीत झालेल्या या अचानक मोठ्या घसरणीमागे प्रामुख्याने तीन महत्त्वाची कारणे आहेत. तज्ज्ञांच्या मते, सोन्या-चांदीचे भाव उच्च पातळीवर असताना गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट बुकिंग केली. तसेच, अमेरिकेकडून जाहीर झालेले आर्थिक आकडे अपेक्षेपेक्षा अधिक मजबूत आल्यामुळे अमेरिकन डॉलर आणि यूएस ट्रेजरी यील्डमध्ये मोठी मजबूती पाहायला मिळाली.

याशिवाय, अमेरिकन फेडरल रिजर्व्ह अधिकाऱ्यांनी व्याजदरांबाबत कठोर भूमिका कायम ठेवण्याचे संकेत दिले. व्याजदर उच्च राहण्याच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदारांनी सोने-चांदीमधून आपले पैसे काढून अधिक चांगला परतावा देणाऱ्या इतर सुरक्षित पर्यायांकडे वळवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे ही घसरण झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E Challan Fraud Alert: ई-चलन भरताना सावधान! बनावट लिंकवर क्लिक करण्याआधी अधिकृत पोर्टलची खात्री करा

Upcoming Cars November 2026: कारप्रेमींसाठी नोव्हेंबर ठरणार खास! महिंद्राच्या Thar E सह मर्सिडीज-बेंझच्या आलिशान कारपर्यंत 7 नव्या गाड्यांची एन्ट्री होणार, पाहा लिस्ट

Goa Tourism Safety: हॉटेल बुकिंगच्या नावाखाली फसवणूक? गोवा पोलिसांकडून सायबर सुरक्षा सल्ला जारी

Mental Freedom from Toxic Relationships: नातं जपताना स्वतःला हरवू नका! मानसिक तुरुंगातून मुक्त होण्यासाठी शिका भावनिक अलिप्तता

IIFA 2026 Winners List: IIFA पुरस्कार सोहळ्यात 'धुरंधर'चा जलवा! रणवीर सिंह सर्वोत्कृष्ट अभिनेता तर अनीत पड्डा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, पाहा संपूर्ण लिस्ट

SCROLL FOR NEXT