Petrol Diesel Prices in Goa |  Dainik Gomantak
अर्थविश्व

Goa Petrol-Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात बदल, गोव्यातील आजचे इंधन दर जाणून घ्या

कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. जागतिक बाजारपेठेत क्रूडच्या किमतीनेही $76 चा टप्पा ओलांडला आहे.

Pramod Yadav

कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. जागतिक बाजारपेठेत क्रूडच्या किमतीनेही $76 चा टप्पा ओलांडला आहे. या बदलाचा परिणाम गुरुवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवर (Petrol-Diesel Price Today) दिसून येत आहे.

सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, नोएडामध्ये पेट्रोल 27 पैशांनी स्वस्त झाले असून, ते 96.65 रुपये प्रति लिटरवर पोहोचले. तर डिझेल 26 पैशांनी घसरून 89.76 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

लखनऊमध्ये पेट्रोल 14 पैशांनी महाग होऊन 96.57 रुपये प्रति लिटर झाले आहे, तर डिझेल 13 पैशांनी वाढून 89.76 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. बिहारची राजधानी पटनामध्ये पेट्रोल 53 पैशांनी स्वस्त होऊन 107.59 रुपये प्रति लीटर विकले जात आहे, तर डिझेल 50 पैशांनी घसरून 94.36 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.71

Panjim ₹ 97.71

South Goa ₹ 97.36

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.26

Panjim ₹ 90.26

South Goa ₹ 89.92

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT