Gmail New Update Dainik Gomantak
अर्थविश्व

Gmail ॲपच्या 'या' नवीन अपडेटमुळे तुमचे काम होईल सोप्पे! वाचा सविस्तर

या कामासाठी तुम्हाला यापुढे वेबवरील तुमच्या मेल आयडीवर लॉग इन करावे लागणार नाही

Kavya Powar

Gmail New Update: आपल्या सर्वांकडे स्मार्टफोन आहेत आणि आपल्या सर्वांचे Gmail खाते देखील आहे. काम करणाऱ्या लोकांकडेही एकापेक्षा जास्त Gmail अकाऊंट असतात. दरम्यान, Google ने Gmail मोबाइल अॅपमध्ये एक महत्त्वपूर्ण अपडेट दिले आहे ज्यामुळे तुमचा बराच वेळ वाचणार आहे.

तसेच, या कामासाठी तुम्हाला यापुढे वेबवरील तुमच्या मेल आयडीवर लॉग इन करावे लागणार नाही. वास्तविक, Google ने Gmail मोबाईल अॅपमध्ये 'Select All' नावाचे फीचर जोडले आहे ज्याच्या मदतीने तुम्ही एकापेक्षा जास्त मेल निवडू शकता. या पर्यायाचा फायदा असा होईल की तुम्ही एकाच वेळी 50 मेल हटवू शकाल.

आत्तापर्यंत अॅपमध्ये असं होतं की तुम्हाला एक एक करून सर्व मेल्स सिलेक्ट करावे लागायचे. म्हणजे एकत्र डिलीट करण्याचा पर्याय नव्हता. हे काम करण्यासाठी, वापरकर्त्यांना त्यांच्या मेल आयडीने वेबवर लॉग इन करावे लागायचे. मात्र, आता अपडेटनंतर जीमेल यूजर्स हे काम मोबाईलवरून करू शकणार आहेत. जे लोक एकापेक्षा जास्त मेल चालवतात त्यांच्यासाठी हे अधिक फायदेशीर ठरेल आणि त्यांचा वेळही वाचेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

National Education Policy Goa: पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 10 वी अन् 11वीतही 'NEP' लागू होणार! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Goa Assembly Three Day Session: सहा महिन्यांचा हिशेब ३ दिवसांत! विरोधी पक्षनेत्यांची टीका, 31ऑगस्‍ट ते 2 सप्‍टेंबर अल्प कालावधीचे अधिवेशन

Student Protest Firing Allegations: 'गृहमंत्र्यांनीच दिला आंदोलकांवर गोळीबाराचा आदेश!' लोकसभेत परीक्षा दुरुस्ती विधेयक मंजूर, विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपाने संसदेत गदारोळ

Goa liquor Smuggling In Telangana: गोवा-तेलंगणा हवाई मद्यतस्करीचा पर्दाफाश; 98 महागड्या बाटल्या जप्त, 2 जण ताब्यात, तपास सुरू

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

SCROLL FOR NEXT