Global Civil Projects IPO: ग्लोब सिव्हिल प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीचा आयपीओ (Initial Public Offering) आजपासून (२४ जून) खुला झाला आहे. येत्या २६ जूनपर्यंत हा आयपीओ खुला राहणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीने ११९ कोटी रुपये उभारण्याचे ध्येय ठेवले आहे. कंपनीच्या आयपीओची प्राईस बँड ६७ ते ७१ ठेवण्यात आली आहे.
द इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, आयपीओ खुला झाल्यापासून आत्तापर्यंत १३ टक्के नोंदणी पूर्ण झाली आहे. ग्रे मार्कट प्रिमियममध्ये (Grey Market Premium) कंपनीचा शेअर १९.७ टक्क्यांनी (१४-१५ रुपये) ट्रेड करत आहे.
कंपनी मुख्य तीन कारणांसाठी पैसा उभारत आहे. खेळतं भांडवल, बांधकाम साहित्य आणि मशीन खरेदीसाठी आणि इतर कार्यालयीन कामांसाठी कंपनी आयपीओच्या माध्यमातून पैसा उभारत आहे.
ग्लोब सिव्हिल प्रोजेक्ट्स आयपीओ २४ जून रोजी खुला झाल्यानंतर २६ जून रोजी बंद होईल. २७ तारखेला शेअर्स वितरण होईल अशी अपेक्षा आहे. आणि ०१ जुलै रोजी स्टॉक्स दिसतील. आयपीओचा प्राईस बँड ६७ ते ७१ रुपये आहे.
दिल्लीतील ग्लोब सिव्हिल प्रोजेक्ट्स प्रामुख्याने इंजिनिअरिंग क्षेत्रात असून, बांधकाम क्षेत्रात देखील कार्यरत आहे. कंपनीचे देशातील ११ राज्यात विविध प्रकल्पावर काम सुरु आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यात कंपनीचे काम सुरु आहे.
वाहतूक, व्यापाराच्या पायभूत सुविधा, सामाजिक आणि व्यावसायिक सुविधा तसेच, व्यावसायिक कार्यालय आणि गृहप्रकल्प देखील कंपनीने हाती घेतले आहेत.
कंपनीचे शैक्षणिक संकुल, रेल्वेच्या पायभूत सुविधा निर्माणात मोठे नाव आहे. तसेच, रेल्वे पूल, विमानतळाचे टर्मिनल, रेल्वेचे उड्डाणपूल आणि हॉस्पिटल निर्माणात देखील कंपनी काम करते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.