PM Kisan Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: असा मिळवा पीएम किसानचा न मिळालेला हप्ता

दैनिक गोमन्तक

PM Kisan Update: पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत आत्तापर्यंत देशातील करोडो लोकांना पैसे मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी पीएम किसानचा 10 वा हप्ता 10.57 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचला आहे. सद्य:स्थितीत दोन कोटी शेतकऱ्यांचा डिसेंबर-मार्चचा हप्ता थकीत आहे. कारण 12.44 कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबे PM किसान (PM Kisan) सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणीकृत आहेत.

(Get PM Kisan installment like this)

जर तुम्हाला पीएम किसानचे पैसे अजून मिळाले नसतील तर काही महत्त्वाचे काम त्वरित करून घ्या. यासाठी पीएम किसान टोल फ्री क्रमांक, हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकतात. येथून तुम्हाला कळेल की तुमचा हप्ता का मिळाला नाही.

हप्ता न मिळण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की आधार, खाते नाव आणि बँक (Bank Account) खाते क्रमांकातील चूक. असे झाल्यास येत्या ऑगस्ट-नोव्हेंबरचा हप्ताही मिळणार नाही. तुम्ही पीएम किसानच्या वेबसाईटला ऑनलाइन भेट देऊन हे दुरुस्त करू शकता.

तुम्हाला या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील...

> तुम्हाला सर्वप्रथम पीएम किसानच्या pmkisan.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल.

> येथे तुम्हाला शीर्षस्थानी लिंक फॉरमर्स कॉर्नर दिसेल.

> तुम्ही या लिंकवर क्लिक केल्यास आधार संपादनाची लिंक दिसेल, जिथे तुम्हाला क्लिक करावे लागेल.

यानंतर तुमच्या समोर उघडणाऱ्या पेजवर तुम्ही तुमचा आधार क्रमांक दुरुस्त करू शकता.

दुसरीकडे, जर खाते क्रमांक चुकीचा भरला असेल आणि तुम्हाला तुमच्या खाते क्रमांकामध्ये काही बदल करायचे असतील, तर तुम्हाला तुमच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी किंवा लेखपालशी संपर्क साधावा लागेल.

म्हणून हप्ताही अडकू शकतो

अनेक राज्यात अपात्र शेतकरीही याचा लाभ घेत होते. अशा शेतकऱ्यांवर सरकारने मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. तामिळनाडू, महाराष्ट्र (Maharashtra) , मध्य प्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी चुकीच्या मार्गाने पैसे घेतलेल्या आयकरदात्यांकडून सर्वाधिक पैसे वसूल केले आहेत. अशा अनेक शेतकऱ्यांची नावे दहाव्या हप्त्यातून काढून टाकण्यात आली आहेत.

स्थिती तपासण्यासाठी या पायऱ्या वापरा

> सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.

> येथे तुम्हाला उजव्या बाजूला 'फार्मर्स कॉर्नर'चा पर्याय मिळेल.

> येथे 'लाभार्थी स्थिती' या पर्यायावर क्लिक करा. येथे एक नवीन पृष्ठ उघडेल.

> नवीन पेजवर आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक यामधील कोणताही एक पर्याय निवडा. या तीन क्रमांकांद्वारे > तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता.

> तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा क्रमांक टाका. त्यानंतर 'Get Data' वर क्लिक करा.

> येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्यवहाराची सर्व माहिती मिळेल. म्हणजेच तुमच्या खात्यात हप्ता कधी आला आणि कोणत्या बँक खात्यात जमा झाला.

तरीही न मिळाल्यास मंत्रालयात याप्रमाणे संपर्क साधा

पीएम किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266

पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक: 155261

पीएम किसान लँडलाइन क्रमांक: 011—23381092, 23382401

पीएम किसानची नवीन हेल्पलाइन: 011-24300606

पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन आहे: 0120-6025109

ई-मेल आयडी: pmkisan-ict@gov.in

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT