Gautam Adani  Dainik Gomantak
अर्थविश्व

Gautam Adani Wealth: हिंडेनबर्गच्या अहवालाने मोठा भूकंप, अब्जाधिशांच्या यादीत अदानींची घसरण!

Gautam Adani Networth: हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाला मोठा झटका बसला आहे. शेअर बाजारात भूकंप झाला.

दैनिक गोमन्तक

Gautam Adani Networth: हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाला मोठा झटका बसला आहे. शेअर बाजारात भूकंप झाला. स्टॉक क्रॅशमुळे गौतम अदानी यांच्या मालमत्तेवरही मोठा परिणाम झाला आहे. भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या निर्देशांकात चौथ्या क्रमाकांवरुन सातव्या क्रमांकावर घसरले.

2022 मध्ये, गौतम अदानी जगातील 10 अब्जाधीशांमध्ये सर्वाधिक नफा कमावणारे उद्योगपती होते. जगातील श्रीमंतांच्या यादीतही ते दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले होते. परंतु 2023 हे वर्ष अदानी समूहासाठी दुःस्वप्न ठरत आहे.

हिंडेनबर्गच्या अहवालातून मोठा भूकंप झाला

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्व काही ठीक होते. पण 24 जानेवारीला अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गचा अहवाल येताच अदानी समूहाचे वाईट दिवस सुरु झाले. दोन दिवसांत त्यांच्या समूहाचे मार्केट कॅप 2.37 लाख कोटी रुपयांवर आले. याच कारणामुळे गौतम अदानी यांची संपत्ती 100.4 अब्ज डॉलरवर आली आहे.

गौतम अदानी (Gautam Adani) फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीश इंडेक्समध्ये जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत चौथ्या क्रमांकावरुन सातव्या क्रमांकावर घसरले. श्रीमंतांच्या यादीतील या उलथापालथीत वॉरन बफे, बिल गेट्स आणि लॅरी एलिसन हे आता आदानी यांच्यापुढे गेले आहेत.

अर्नॉल्ट सर्वात श्रीमंत

फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट 215 अब्ज डॉलर्ससह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. दुसऱ्या क्रमांकावर टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) आहेत, ज्यांची मालमत्ता $170.1 अब्ज आहे. अॅमेझॉनचे सह-संस्थापक जेफ बेझोस 122.4 अब्ज डॉलर्ससह तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

गौतम अदानी यांच्या संपत्तीत झालेल्या घसरणीचा सर्वाधिक फायदा लॅरी एलिसन यांना झाला आहे. श्रीमंतांच्या यादीत ते चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहेत. $932 दशलक्षच्या वाढीनंतर, त्यांची एकूण संपत्ती $112.8 अब्ज झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

SCROLL FOR NEXT