Gautam Adani  Dainik Gomantak
अर्थविश्व

Gautam Adani: गौतम अदानींचा मोठा सौदा! आणखी एक सिमेंट कंपनी घेतली विकत; 10442 कोटींचा करार

Manish Jadhav

Penna Cement Deal: सिमेंट उद्योगात अदानी समूहाचा दबदबा सातत्याने वाढत आहे. आता अदानी समूहाची सिमेंट कंपनी अंबुजा सिमेंटने पेन्ना सिमेंट इंडस्ट्रीजसोबत करार केला आहे. हा करार 10,442 कोटीत झाला आहे. या करारामुळे अंबुजा सिमेंट दक्षिण भारतात आपला व्यवसाय वाढवण्याचा विचार करत आहे. सप्टेंबर 2022 मध्ये अदानी समूहाने अंबुजा सिमेंट खरेदी केल्यानंतर कंपनीचा हा चौथा मोठा बिझनेस करार आहे. हैदराबादस्थित पेन्ना सिमेंटचे प्रमोटर पी प्रताप रेड्डी आणि त्यांचे कुटुंब आहेत. या ग्रुपचे वार्षिक सिमेंट उत्पादन 14 दशलक्ष टन आहे, त्यापैकी 4 दशलक्ष टन सिमेंट तयार करण्याचा कारखाना सध्या तयार आहे.

अंबुजाचा हिस्सा दक्षिण भारतात 8 टक्क्यांनी वाढेल

अंबुजा सिमेंटच्या वतीने, पेन्ना कंपनी विकत घेण्यासाठी स्वतःची बचत केलेली रक्कम वापरेल. त्यामुळे दक्षिण भारतातील अंबुजा सिमेंटचा वाटा 8 टक्क्यांनी वाढणार आहे. मार्केट लीडर अल्ट्राटेक सिमेंटने केसोराम इंडस्ट्रीजचे कारखाने काही महिन्यांपूर्वी विकत घेतल्यानंतर हा करार झाला आहे. अंबुजा सिमेंटकडे एप्रिल अखेरीस 24,338 कोटी एवढी रक्कम होती. यामध्ये अदानी समूहाच्या 8,339 कोटी रुपयांच्या वॉरंट रकमेचाही समावेश आहे.

ACC आणि सांगी इंडस्ट्रीज देखील अंबुजाचा भाग आहेत

टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, पेन्ना सिमेंटसोबत झालेल्या करारानंतर अंबुजा सिमेंटला उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी मदत मिळणार आहे. सध्या ACC आणि सांगी इंडस्ट्रीज देखील अंबुजाचा भाग आहेत. 2028 पर्यंत 140 दशलक्ष टन सिमेंटचे उत्पादन करण्याचे समूहाचे उद्दिष्ट आहे. कुमार मंगल बिर्ला यांच्या मालकीच्या अल्ट्राटेक सिमेंटची क्षमता 150 दशलक्ष टनांपेक्षा जास्त आहे. देशातील तिसरी सर्वात मोठी सिमेंट उत्पादक कंपनी, हरि मोहन बांगूर यांच्या नेतृत्वाखालील श्री सिमेंटने एप्रिलमध्येच आंध्र प्रदेशमध्ये 3 दशलक्ष टन क्षमतेचा कारखाना सुरु केला आहे. यासोबतच कंपनीने उत्पादन क्षमता 56 दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

आधी आयपीओ आणण्याची योजना होती!

अंबुजा सिमेंटने यापूर्वी गुजरातमधील सांगी, तामिळनाडूमधील माय होम सिमेंट फॅक्टरी आणि हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील एशियन काँक्रीट आणि सिमेंटचे कारखाने खरेदी केले होते. प्रताप रेड्डी यांनी यापूर्वी सिमेंट व्यवसायासाठी आयपीओ आणण्याची योजना आखली होती. पण नंतर त्यांनी आपला प्लॅन बदलला. ऑक्टोबर 2021 मध्ये, पेन्नाला 1550 कोटी रुपयांचा IPO लॉन्च करण्यासाठी SEBI कडून मंजुरी मिळाली. पण तो पुढे नेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grammy Award विजेता कलाकार गोवा सनबर्नमध्ये करणार सादरीकरण; Skrillex, DJ Peggy Gou यांची नावे जाहीर

Sindhudurg: गोव्यात मौजमजेसाठी येणाऱ्या पोलिसांना कर्तव्याचा विसर, कॉलेज तरुणीची काढली छेड, स्थानिकांनी दिला चोप

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

SCROLL FOR NEXT