Manish Jadhav
जगातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत शनिवारी मोठा उलटफेर झाला. मुख्य:त भारतीय अब्जाधीशांच्या क्रमवारीत हा बदल दिसून आला आहे
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना नेट वर्थच्या बाबतीत मागे टाकले आहे.
गेल्या काही दिवसांत शेअर बाजारात सूचिबद्ध झालेल्या अदानींच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे त्यांच्या संपत्तीत (गौतम अदानी नेटवर्थ) मोठी वाढ झाली आहे.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना मागे टाकून अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे त्यांच्या संपत्तीत नुकत्याच झालेल्या वाढीमुळे जगातील 11 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 111 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.
ब्लूमबर्गच्या मते, मुकेश अंबानी यांची संपत्ती 109 अब्ज डॉलर आहे आणि या आकडेवारीसह ते जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत 12 व्या स्थानावर घसरले आहेत.
गेल्या 24 तासांत गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ पाहायला मिळाली. त्यांची एकूण संपत्ती 5.45 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 45,000 कोटी रुपयांनी वाढली आहे.
2024 मध्ये गौतम अदानी सर्वाधिक कमाई करणाऱ्या अब्जाधीशांपैकी एक आहेत. 1 जानेवारी 2024 पासून आतापर्यंत त्यांनी 26.8 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत यावर्षी 12.7 अब्ज डॉलरची वाढ झाली.