Ration Card Holders Dainik Gomantak
अर्थविश्व

Free Ration Update: राशनकार्डधारकांसाठी खूशखबर ! सरकारने केला मोठा बदल

Fortified Rice In free Ration scheme: सरकारच्या मोफत राशन योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता मोफत राशनमध्ये पौष्टिक आहार मिळणार आहे.

दैनिक गोमन्तक

Fortified Rice In Free Ration Scheme: सरकारच्या मोफत राशन योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता मोफत राशनमध्ये पौष्टिक आहार मिळणार आहे. लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या राशनवर सरकारकडून मोठी अपडेट आली आहे. सरकार मोफत राशनच्या एका मोठ्या नियमात बदल करत आहे, ज्याचा फायदा एप्रिल 2023 पासून देशातील करोडो लोकांना मिळू लागेल. या बदलानंतर सुमारे 60 लाख राशनकार्डधारकांना चांगला आणि पौष्टिक तांदूळ मिळणार आहे.

नवा नियम कधी लागू होणार?

विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार (फोर्टिफाइड राइस इन फ्री रेशन स्कीम NFSA) सरकारने (Government) 1 एप्रिल 2023 पासून सर्व कार्डधारकांना फोर्टिफाइड तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरुन देशातील करोडो कार्डधारकांना पौष्टिक राशन मिळेल.

लाभार्थ्यांना पोर्टिफाइड तांदूळ मिळेल

यासाठी सरकारने सुमारे 11 कंपन्यांचे पॅनेल तयार केले असून, ते या योजनेसाठी काम करतील. सध्या ही सुविधा फक्त हरिद्वार आणि यूएस नगरच्या लोकांसाठी उपलब्ध आहे. मात्र सरकारच्या या निर्णयानंतर आता देशभरातील लोकांना खायला फोर्टिफाइड तांदूळ मिळणार आहे.

गरजूंसाठी पोषक धान्य आवश्यक

एवढेच नाही तर या योजनेंतर्गत गरजूंना पौष्टिक आहार मिळावा, यासाठी सरकार लवकरच राशन दुकानांवर गहू, तांदूळ याशिवाय इतर पौष्टिक पदार्थ उपलब्ध करुन देणार आहे. यावर उत्तराखंड (Uttarakhand) सरकारनेही माहिती दिली की, गरजू लोकांच्या पोषणाचा विचार करुन सरकार यावर विचार करत आहे. वास्तविक, गरजू आणि गरीब लोकांना सर्व वस्तू सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

पोर्टिफाइड तांदूळ म्हणजे काय?

फोर्टिफाइड तांदूळ सामान्य तांदळाच्या तुलनेत अधिक पौष्टिक असतो, जो बनवायलाही खूप सोपा असतो. सामान्य भातामध्ये खनिजे, प्रथिने आणि जीवनसत्त्वे ठराविक प्रमाणात असताता, तर फोर्टिफाइड भातामध्ये लोह, जीवनसत्त्वे, कॅल्शियम आणि बी-12 यासह अनेक पोषक घटक असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्सी फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT