Fraud Call: Beware of this customer care number Dainik Gomantak
अर्थविश्व

Fraud Call: 'या' कस्टमर केअर नंबरपासून राहा सावध!

कस्टमर केअरद्वारे होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सावध केले आहे.

दैनिक गोमन्तक

भारतामध्ये डिजिटलायझेशन वाढल्याने फसवणुकीचे प्रकार अधिक वाढले आहेत. फसवणूक करणाऱ्यांसाठी नवे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. अनेक वेळा तुम्हाला याचा अनुभव देखिल आला असेल. अनेक वेळा तुम्हाला बँकेचे अधिकारी बनून कॉल करतात, यांनतर ते तुमच्या कार्डची माहिती घेऊन तुमच्या खात्यातील पैसे (Money) काढून घेतात. पण फसवणूक (Fraud) करणाऱ्याची एकच पद्धत नसून ते अनेक नवनवीन पद्धतीने फसवुक करतात. अनेक वेळा ते कस्टमर केअरचा नंबर वापरून लोकांची फसवणूक करतात.

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना या फसवणुकीबाबत सावध केले आहे. SBI ने आपल्या ग्राहकांना मेल आणि मॅसेजद्वारे सांगितले आहे की SBI यापुढे SBI कार्डवर दिलेल्ल्या 18601801290 किंवा 18001801290 या दोन हेल्पलाईन (Helpline) नंबरवरून कॉल करणार नाही. याचे कारण म्हणजे यासारख्या नंबरचा वापर करून लाखोंची फसवणूक केली आहे. गेल्या काही दिवसात अशी प्रकरणे समोर आली आहेत.

अनेकांना गूगलवर (Google) कस्टमर केअरचा नंबर शोधण्याची सवय असते. पण असे करणे टाळावे. यामुळे आपले मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. अनेक वेळा गूगलवर दिसणारे नंबर हे फसवणूक करणाऱ्या लोकांचे असतात. तुमच्या खात्याची माहिती घेऊन तुमचे खाते खाली करू शकतात. तसेच मोबाइलवरून कोणालाही आपल्या बँक (Bank) खात्याबद्दल माहिती देऊ नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT