car 
अर्थविश्व

फोक्सवॅगन इंडियाचे उत्पादन पुन्हा सुरू

Dainik Gomantak

औरंगाबाद

स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने (एसएव्हीडब्ल्यूआयपीएल) औरंगाबाद येथील केंद्रातील उत्पादन सुरू केले आहे. त्याचबरोबर पुणे केंद्रातील इंडिया २.० प्रकल्पाच्या कामांनाही सुरवात झाली आहे, अशी माहिती स्कोडा ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक गुरप्रताप बोपराय यांनी दिली.
बोपराय म्हणाले, ‘‘स्थानिक प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य सरकारकडून सर्व आवश्यक त्या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. या केंद्रांमधील उत्पादन क्रिया सुरू करण्यापूर्वी तेथे सर्वसमावेशक सुरक्षा उपाययोजनांचा अवलंब करण्यास सुरवात करण्यात आली आहे. दोन्ही केंद्रांमध्ये सुस्पष्टपणे देण्यात आलेल्या सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी होत आहे. यासाठी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून ६० कलमी उपाययोजनांची यादी करण्यात आली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या साहाय्याने ‘स्टार्ट सेफ’ एसओपी तयार करण्यात आली असून, यामध्ये एसएव्हीडब्ल्यूआयपीएलच्या सर्व क्षेत्रातील कामांमध्ये सर्वसमावेशक उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे.’’

मोठ्या आशेने पुढे बघावे लागणार
श्री. बोपराय म्हणाले , ‘‘कोविड-१९ पश्चातील काळात काही नव्या आणि जुन्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. पुन्हा एकदा आपल्याला मोठ्या आशेने पुढे बघावे लागणार आहे. उत्पादन सुरू झाले की बाजारातील मागणी आणि ग्राहकांच्या गरजांचा आपण जास्त चांगल्या रीतीने सामना करू शकू. सुरक्षित उत्पादन आणि सुरक्षित कार्यालय संकल्पना विकसित करण्यासाठी आणि आमच्या कार्यात त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने काही आठवड्यांपासून आम्ही सरकार, स्थानिक प्रशासन आणि आमची वैद्यकीय टीम यांच्यासोबत अतिशय काळजीपूर्वक काम करत आहोत,’’ असे ते म्हणाले.

एका शिफ्टमध्ये काम
औरंगाबाद येथील केंद्रातील उत्पादन सुरू करण्यात आले असून, तेथे कमी कर्मचारी वर्ग एकाच शिफ्टमध्ये काम करीत आहेत. पुढील आठवड्यात अपेक्षित असणाऱ्या लोकार्पण सोहळ्यापूर्वी या केंद्रात नव्या ‘सुपर्ब’ची निर्मिती वेळेआधीच पूर्ण होईल. इतर मॉडल्स आणि ब्रँड्सचा समावेश करण्यासाठी उत्पादन गतीला कालांतराने वेग येईल. पोर्ट्सचे कामकाज सुरळीत झाले आणि कर्मचारी वर्गाची संख्या सुधारत गेली, की अंतर्गामी लॉजिस्टिक्सची कार्यकारी कार्यक्षमता आणि भागांची उपलब्धता यामुळे हळूहळू पूर्ण क्षमतेने उत्पादन वाढेल आणि सामान्य दैनंदिन कामे पुन्हा रुळावर येतील, असेही श्री. बोपराय म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

SCROLL FOR NEXT