Rupaya Vs Dollar  Dainik Gomantak
अर्थविश्व

Rupee At All Time Low: रूपयांत पुन्हा ऐतिहासिक घसरण; पहिल्यांदाच डॉलरच्या तुलनेत रूपयाचा विनियम दर 83 वर

66 पैशांची घसरण; 2023 पर्यंत रूपया डॉलरच्या तुलनेत 85 रूपयांवर जाणार

गोमन्तक डिजिटल टीम

Rupee At All Time Low: करन्सी बाजारात (Currency Market) बुधवारी पुन्हा एकदा रूपयामध्ये ऐतिहासिक घसरण पाहायला मिळाली. डॉलरच्या तुलनेत रूपयाचा विनियम दर बुधवारी ८३ रूपयाच्याही पुढ गेला. करन्सी बाजार बंद होईपर्यंत रूपयात ०.८ टक्के म्हणजे तब्बल ६६ पैशांनी घसरण झाली. मार्केट बंद होईपर्यंत रूपया-डॉलर विनियम दर ८३.०२ वर आला होता.

अमेरिकेतील बाँड रेटमध्ये वाढ झाल्यानंतर भारतीय रूपयात घसरण पाहायला मिळाली. भारत सरकारच्या १० वर्षांच्या बाँडवर यील्ड वाढून आता 7.4510 टक्क्यांवर गेले आहे. रूपया जेव्हा डॉलरच्या तुलनेत 82.40 वर होता तेव्हा रिझर्व्ह बँकेने यात लक्ष घालत रूपयाला घसरणीपासून रोखण्याचा प्रयत्न केला होता.

पण आरबीआयने लक्ष घातले नाही तर रूपयातील घसरणीचा क्रम असाच सुरू राहू शकतो. तज्ज्ञांच्या मते, मार्च २०२३ पर्यंत रूपया डॉलरच्या तुलनेत ८५ रूपयांवर जाऊ शकतो. आरबीआयने लक्ष घातल्यानंतर भारताच्या परदेशी चलनातही घट दिसून येऊ लागली आहे. एक वर्षभरापुर्वी भारताच्या परदेशी चलनाचा साठा ६४२ अब्ज डॉलर इतका होता.

तो आता ५३८ अब्ज डॉलर इतका राहिला आहे. म्हणजेच परदेशी चलनात १०० अब्ज डॉलरची घट झाली आहे. तज्ज्ञांच्या मते भारताकडील परदेशी चलनात घट होऊन हा साठा ५०० अब्ज डॉलर राहु शकतो.

डॉलरच्या तुलनेत रूपया महागल्याने त्याचा मोठा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार आहे. एक तर भारतात होणारी आयात महागणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या करंट खात्यातील तूट वाढू शकते. २०२२-२३ या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमिहीत म्हणजे एप्रिल ते जून याकाळाच चालू खात्यातील तोटा वाढून २३.९ अब्ज डॉलरवर गेला आहे. हा तोटा जीडीपीच्या २.८ टक्के इतका आहे. रूपया महागल्याने महागाई वाढण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT