Gmail Account Dainik Gomantak
अर्थविश्व

तुमचे Gmail खाते हॅक झाले आहे?

तुमच्या जीमेल आयडीवरून अनेक खाती हॅक होऊ शकतात. म्हणूनच जीमेल खात्याची सुरक्षा आणि जागरूकता तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

दैनिक गोमन्तक

जीमेल Gmail ही जगातील सर्वाधिक वापरली जाणारी ईमेल सेवा आहे. जास्तीजास्त लोक जीमेल आयडी वापरतात. भारतात सायबर सुरक्षा आणि गोपनीयतेबद्दल जागरूकता फारच कमी आहे.

सामान्यतः Gmail खात्याशी इतर अनेक खाती लिंक केलेली असतात. तुम्ही तुमच्या Gmail खात्याशी किती पासवर्ड सिंक ठेवता? अशा परिस्थितीत जर तुमचे जीमेल अकाउंट हॅक झाले तर तुम्ही खूप अडचणीत येऊ शकता. तुमच्या जीमेल आयडीवरून अनेक खाती हॅक होऊ शकतात. म्हणूनच जीमेल खात्याची सुरक्षा आणि जागरूकता तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. बऱ्याचवेळेला दुसरे कोणीतरी तुमचे Gmail ऍक्सेस करत आहेत; आणि तुम्हाला ते माहित नसेल तर, या पद्धतीने जाणुन घ्या.

तुम्ही कोणत्या डिव्हाइसवरून Gmail अ‍ॅक्सेस करता?

सर्वप्रथम, तुमच्या Google खात्यावर जाऊन तुम्ही आतापर्यंत किती डिव्हाइसेसवरून Gmail अ‍ॅक्सेस केले आहे, ते तपासून घ्या. तुमच्या Google खात्यावर जा आणि नेव्हिगेशन पॅनेलमधून सुरक्षा पॅनेलवर जा.

सुरक्षा पॅनेलमध्ये मॅनेज डिव्हाइसेसचा पर्याय असेल. येथे क्लिक करून, तुम्ही एकाच वेळी किती डिव्हाइसेसवरून लॉग इन केले आहे ते तुम्हाला दिसेल. अधिक तपशीलांसाठी, तुम्ही सूचीमधून डिव्हाइस निवडू शकता. तुम्हाला जर या सूचीमध्ये असे कोणतेही उपकरण दिसले की ज्यातून तुम्ही लॉग इन केलेले आहे, तर समजून घ्या की कोणीतरी तुमचे खाते ऍक्सेस करत आहे. यामध्ये चांगली बाब अशी आहे की येथून तुम्ही साइन आउट करून तुमचा Gmail त्या डिव्हाइसवरून काढून टाकू शकता.

लक्षात ठेवा, हॅकर्स आयपी बाउन्स करण्यासाठी वेगवेगळ्या टूल्सचाही वापर करतात, त्यामुळे आयपीवरून योग्य ठिकाण जाणून घेणे शक्य होत नाही. तथापि, तुम्ही Gmail च्या सिक्युरिटी चेक अप पर्यायावर टॅप करून अधिक माहिती मिळवू शकता आणि तुमचे खाते सुरक्षित करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT