Union Ministry of Finance Dainik Gomantak
अर्थविश्व

Finance Ministry Meeting: खूशखबर! शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अर्थ मंत्रालयाने बँकांना दिले 'हे' आदेश

Finance Ministry Review Meeting: वित्तीय सेवा सचिव विवेक जोशी यांनी गुरुवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँका (PSU) आणि वित्तीय संस्थांच्या प्रमुखांची बैठक घेतली.

Manish Jadhav

Finance Ministry Review Meeting with PSU Banks: वित्तीय सेवा सचिव विवेक जोशी यांनी गुरुवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँका (PSU) आणि वित्तीय संस्थांच्या प्रमुखांची बैठक घेतली.

बैठकीदरम्यान, जोशी यांनी त्यांना जन सुरक्षा आणि मुद्रा योजना यासारख्या विविध आर्थिक समावेशक योजनांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.

पशुसंवर्धन विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी देखील आढावा बैठकीत सहभागी झाले होते.

तीन महिन्यांची मोहीमही राबविण्यात आली

वित्त मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, जोशी यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आर्थिक समावेशासाठी विविध योजनांतर्गत दिलेली उद्दिष्टे सूचीबद्ध पद्धतीने साध्य करण्याचे आवाहन केले.

मंत्रालयाने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) चे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मोहीम देखील सुरु केली आहे.

जनजागृती मोहीम राबविण्याची विनंती केली

निवेदनानुसार, लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना जोडण्यासाठी बँकांना त्यांच्या बँकिंग करस्पॉन्डंट नेटवर्कचा लाभ घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

वित्तीय सेवा सचिवांनी बँकांना या योजनांबद्दल प्रादेशिक किंवा स्थानिक भाषांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्याची विनंती केली.

शेतकऱ्यांचे (Farmers) उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारकडून (Government) सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक सुविधा देण्याचे आदेश अर्थ मंत्रालयाकडून बँकांना देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT