faulty battery cells modules caused ev electric scooter fire in india initial probe finds  Danik Gomantak
अर्थविश्व

इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याचे कारण आले समोर

ओला स्कूटरला आग लागल्याचे कारण बॅटरी सेल आणि बॅटरी मॅनेजमेंट सिस्टममधील बिघाड

दैनिक गोमन्तक

इलेक्ट्रिक वाहनाला लागलेल्या आगीचे कारण आता समोर आले आहे. आगीच्या घटनांबाबत गंभीर भूमिका घेत सरकारने तपास सुरू केला होता आणि आता प्राथमिक अहवालात आगीची कारणे समोर आली आहेत. (faulty battery cells modules caused ev electric scooter fire in india initial probe finds)

बॅटरी सेलच्या अपयशाचे मुख्य कारण

सरकारच्या प्राथमिक तपासात इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याचे कारण बॅटरी सेल आणि मॉड्युल्सचा दोष असल्याचे सांगण्यात आले आहे. रॉयटर्सने दोन सरकारी स्रोतांचा हवाला देत वृत्त दिले आहे की, सरकारने तीन कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याच्या घटनेची चौकशी सुरू केली आहे. यामध्ये ओला इलेक्ट्रिक आणि ओकिनावा यांचा समावेश आहे.

Ola आणि Okinawa मध्ये ही त्रुटी आढळली

अहवालात दावा करण्यात आला आहे की, ओला स्कूटरला आग लागल्याचे कारण बॅटरी सेल आणि बॅटरी मॅनेजमेंट सिस्टममधील बिघाड आहे. तर ओकिनावाच्या बाबतीत, बॅटरी सेल आणि बॅटरी मॉड्यूल्सशी संबंधित दोष आढळला. दुसरीकडे, प्युअर ईव्हीच्या स्कूटरला आग लागल्याचे कारण बॅटरीचे केसिंग योग्य नसल्याचे सांगण्यात आले आहे.

येत्या दोन आठवड्यांत अंतिम अहवाल येईल

पुढील दोन आठवड्यांत तपासाचा अंतिम अहवाल येईल, असा दावा वृत्तात करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी सरकारने तिन्ही कंपन्यांच्या बॅटरी सेलचे नमुने घेतले आहेत. दरम्यान, ओला इलेक्ट्रिकने दावा केला आहे की, त्यांच्या स्कूटरमध्ये थर्मल समस्या दिसल्या आहेत.

अलीकडच्या काळात देशात इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये 3 जणांना जीव गमवावा लागला. नंतर, ओकिनावा आणि ओला यांनीही त्यांच्या स्कूटर मोठ्या प्रमाणात परत मागवल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT