sim card Dainik Gomantak
अर्थविश्व

Aadhar Card Fraud: मृत व्यक्तीच्या आधारावर मिळणार नाही सिमकार्ड! फ्रॉड रोखण्याचा नवा फॉर्मूला

आधार कार्डमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी नवा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

Aadhar Card Sim Card Fraud: डिजिटल युगात मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. यात आधार कार्डमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी नवा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. आता मृत व्यक्तीच्या आधार कार्डवर नवीन सिम जारी करण्यात आल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल.

सक्रिय आधार कार्ड आणि त्या व्यक्तीच्या फोटोमुळे असे होते. साधारणपणे नवीन सिम घेण्यासाठी आधार कार्ड आणि फोटो आवश्यक असते. यानंतर नवीन सिम सहज घेता येते. पण आता या फसवणुकीला आळा घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

  • मृत व्यक्तीचे आधार कार्ड डिलिट होणार

एका रिपोर्टनुसार, मृत व्यक्तीचे आधार कार्ड डिलीट करण्यासाठी सरकारकडून एक नवीन प्रणाली विकसित केली जात आहे. हा प्रोजेक्ट सध्या पाइपलाइनमध्ये आहे, जो लवकरच सर्वसामान्यांसाठी लागू केला जाऊ शकतो.

UIDAU आणि रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया प्रमाणे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या प्रोसेसमध्ये मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र अपडेट केल्यावर, त्या व्यक्तीचे आधार कार्ड डिलीट केले जाईल.

  • सध्या कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही

रिपोर्टनुसार जेव्हा मृत्यू प्रमाणपत्र अपडेट केले जाईल. तेव्हा मृत व्यक्तीच्या कुटुंबाशी संपर्क साधला जाईल. यानंतर कुटुंबाच्या परवानगीनंतर त्या व्यक्तीचे आधार कार्ड डिलीट केले जाणार आहे. राज्य सरकारच्या सहकार्याने ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. सध्या मृत व्यक्तीचे आधार कार्ड डिलिट करण्याची कोणतीही तरतूद नाही.

फसवणुकीला आळा बसणार

मृत व्यक्तीचे आधार डिलीट केल्यास आगामी काळात आधार संदर्भात होणारी फसवणूक रोखण्यास मदत होईल, असा विश्वास आहे. आधारवर नवीन सिम कार्ड मिळवणे ही सर्वात सोपी प्रोसेस आहे. मात्र आता सरकारने यावर कडक कारवाई करण्याची तयारी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT