EPFO to launch WhatsApp facility soon Dainim Gomantak
अर्थविश्व

देशातील करोडो नोकरदारांसाठी मोठी बातमी! EPFO लवकरच सुरु करणार व्हॉट्सॲप सर्व्हिस; आता एका 'हॅलो'वर मिळणार पीएफ बॅलन्स आणि क्लेम स्टेटसची माहिती

EPFO 3.0 Digital Services: देशातील करोडो नोकरदारांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे.

Manish Jadhav

EPFO WhatsApp Service: देशातील करोडो नोकरदारांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. पीएफ खातेधारकांसाठी ईपीएफओ लवकरच एक नवीन आणि हायटेक सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहे, ज्यानंतर युझर्संना पीएफशी संबंधित कामांसाठी वारंवार वेबसाइटवर जाऊन लॉगइन करण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही.

आता नोकरदार लोकांना त्यांच्या मोबाईल फोनवर अगदी सहजपणे पीएफ बॅलन्स, क्लेम स्टेटस आणि पैशांच्या व्यवहारांची सविस्तर माहिती मिळवता येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईपीएफओ आपली अधिकृत व्हॉट्सॲप सेवा लॉन्च करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पीएफ खात्याची माहिती मिळवणे आधीपेक्षा खूपच सोपे आणि सुटसुटीत होणार आहे.

सध्याच्या घडीला पीएफ खातेधारकांना त्यांच्या खात्याची माहिती घेण्यासाठी यूएएन पोर्टल, उमंग ॲप किंवा ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन लॉगइन करावे लागते. याशिवाय एसएमएस आणि मिस्ड कॉलद्वारेही बॅलन्स तपासण्याची सुविधा उपलब्ध आहे. परंतु, 'ईपीएफओ 3.0' (EPFO 3.0) अंतर्गत सेवांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी व्हॉट्सॲप सेवेचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. ही सेवा सुरु झाल्यानंतर पीएफ खातेधारकांना ईपीएफओच्या अधिकृत व्हॉट्सॲप नंबरवर फक्त 'Hello' असा मेसेज पाठवावा लागेल.

हा मेसेज जाताच तिकडून चॅटबॉट किंवा ऑटोमेटेड सिस्टिम युझर्संच्या स्क्रीनवर काही पर्याय दाखवेल. त्यामध्ये पीएफ बॅलन्स चेक, क्लेम स्टेटस किंवा ट्रान्झॅक्शन हिस्ट्री यांसारखे पर्याय असतील. त्यातील योग्य पर्याय निवडून खातेधारक काही सेकंदांत आपली माहिती मिळवू शकतील. जर पहिल्या टप्प्यात हा प्रयोग यशस्वी झाला, तर ईपीएफओ व्हॉट्सॲपद्वारे इतर अनेक प्रगत सुविधाही उपलब्ध करुन देणार आहे.

ईपीएफओची (EPFO) ही नवीन व्हॉट्सॲप सुविधा हुबेहूब बँकिंग क्षेत्रातील व्हॉट्सॲप सेवांसारखीच असणार आहे, जिथे ग्राहक सध्या आपल्या बँक खात्याची माहिती अगदी सहज मिळवतात. या सुविधेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे क्लेम स्टेटस ट्रॅक करणे अत्यंत सोपे होईल. कर्मचाऱ्यांनी पीएफ काढण्यासाठी किंवा ट्रान्सफर करण्यासाठी केलेल्या क्लेमची सद्यस्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांना कोणत्याही ॲपवर जाण्याची गरज पडणार नाही. थेट व्हॉट्सॲपवर चॅटबॉटशी संवाद साधून कधीही आणि कुठूनही ही माहिती घेता येईल. यामुळे नोकरदार लोकांच्या वेळेची मोठी बचत होणार असून डिजिटल सेवांचा विस्तार अधिक वेगाने होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT