EPFO Dainik Gomantak
अर्थविश्व

PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! EPFO ने दिला अलर्ट, जाणून घ्या नाही तर...

EPFO Alert: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (EPFO) सर्व वापरकर्त्यांसाठी एक अलर्ट जारी केला आहे.

दैनिक गोमन्तक

EPFO: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (EPFO) सर्व वापरकर्त्यांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. ईपीएफओने आपल्या सर्व सदस्यांना सांगितले की, 'कोणत्याही खातेधारकाने चुकूनही खात्याशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करु नये. यामुळे खातेदार मोठ्या फसवणुकीला बळी पडू शकतात. जर ईपीएफ खात्याची माहिती फसवणूक करणाऱ्यांच्या हाती लागली तर ते तुमच्या खात्यातून पैसे गायब करु शकतात.'

दरम्यान, ईपीएफओने म्हटले की, 'ईपीएफओ (EPFO) कधीही आपल्या सदस्यांना आधार, पॅन, यूएएन, बँक तपशीलांची माहिती विचारत नाही. जर कोणी फोन किंवा सोशल मीडियावर (Social Media) अशी माहिती मागितली तर काळजी घ्या आणि ती अजिबात शेअर करु नका. अशा फसव्या फोन कॉलला प्रतिसाद देऊ नका.'

फिशिंग ऑनलाइन फसवणूक

पीएफ (PF) खात्यात, लोकांची मोठी कमाई जमा केली जाते, जी लोक सेवानिवृत्तीच्या खर्चासाठी जमा करतात. फसवणूक करणाऱ्यांना हे चांगलेच ठाऊक आहे की, इथे त्यांना एका झटक्यात मोठी रक्कम मिळेल, म्हणून ते फिशिंग अटॅकद्वारे खात्यावर हल्ला करतात. वास्तविक, फिशिंग हा ऑनलाइन फसवणुकीचा एक भाग आहे, ज्यामध्ये ठेवीदारांना फसवले जाते. त्यांच्याकडून खात्याशी संबंधित आवश्यक माहिती मिळवली जाते आणि नंतर खाते साफ केले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Team India: "मी आत्महत्या करणार होतो", टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचा धक्कादायक खुलासा; क्रिडाविश्वात खळबळ

Goa Accidental Deaths: ..अजून किती लोकांचे जीव जाणार? गोव्यात अपघाती बळींचे दीडशतक; 25 जुलैपासून सात जणांचे मृत्यू

Liquor Deaths Goa: गोव्यात दारूमुळे होतो 'इतक्या' लोकांचा मृत्यू, धक्कादायक आकडेवारी उघड; सर्वाधिक मृत्‍यू 41 ते 50 वयोगटातील

Amthane Dam: प्रतिक्षा कधी संपणार? 'आमठाणे धरण' अजूनही कोरडेच! गेट दुरुस्तीचे काम लांबणीवर

Ladli Laxmi Yojana: गावडेंकडून महिला-बाल कल्‍याण अधिकारी लक्ष्य, 'लाडली लक्ष्‍मी'च्‍या प्रलंबित अर्जांवरून अधिकाऱ्यांवर केले आरोप

SCROLL FOR NEXT