Elon Musk Dainik Gomantak
अर्थविश्व

Elon Musk : एलन मस्क पुन्हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Elon Musk Net Worth: पुन्हा एकदा एलोन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्याचवेळी फ्रेंच बिझनेसमेन बर्नार्ड अरनॉल्ट यांना मोठे नुकसान झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Elon Musk Net Worth

एलन मस्क पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. टेस्लाच्या सीईओने फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अरनॉल्ट यांना मागे टाकले आहे. गेल्या काही दिवसांपासून एलोन मस्क यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. त्याच वेळी, पॅरिस ट्रेडिंगच्या बर्नार्ड अरनॉल्ट यांच्या एलव्हीएमएचचे शेअर्स 2.6 टक्क्यांनी घसरले.

बर्नार्ड अरनॉल्ट यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या घसरणीमुळे एलन मस्क पुन्हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकात या वर्षी अव्वल स्थानासाठी स्पर्धा होती.

कधी एलन मस्क तर कधी बर्नार्ड अरनॉल्ट वरच्या स्थानावर होते. तथापि, बर्नार्ड अरनॉल्ट या वर्षात बराच काळ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले. आणि एलन मस्क दुसऱ्या स्थानावर होते.

बर्नार्ड अरनॉल्ट यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

बर्नार्ड अरनॉल्ट हे ७४ वर्षांचे फ्रेंच बिझनेस टायकून आहेत. डिसेंबर 2022 मध्ये मस्क यांना मागे टाकून ते पहिल्यांदाच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. अरनॉल्ट यांनी LVMH कंपनीची स्थापना केली, जी लुई व्हिटॉन, फेंडी आणि हेनेसी या ब्रँडची मालक आहे.

ब्लूमबर्ग वृत्तसंस्थेनुसार, चीनच्या महत्त्वाच्या बाजारपेठेत मंद आर्थिक वाढीमुळे लक्झरी क्षेत्र खाली आले आहे. अशा परिस्थितीत एप्रिलपासून LVMH चे शेअर्स सुमारे 10 टक्क्यांनी घसरले आहेत.

एका दिवसात 11 अब्ज डॉलरचे नुकसान

एका वेळी, एका दिवसात अरनॉल्ट यांच्या एकूण मालमत्तेतून $11 बिलियनचे नुकसान झाले होते. दुसरीकडे, बुधवारी त्यांच्या एकूण मालमत्तेत $5.25 अब्जांचे नुकसान झाले आहे. आता बर्नार्ड अरनॉल्ट यांची एकूण संपत्ती १८७ अब्ज डॉलर्स झाली आहे. मात्र, यावर्षी त्यांची संपत्ती २४.५ अब्ज डॉलरने वाढली आहे.

एलन मस्क यांच्याकडे किती संपत्ती होती?

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेल्या एलन मस्क यांची संपत्ती 192 अब्ज डॉलर झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, बुधवारी एलोन मस्क यांच्या एकूण संपत्तीत $1.98 अब्जची वाढ झाली आहे. या वर्षी त्यांची एकूण संपत्ती ५५.३ अब्ज डॉलरने वाढली आहे.

गेल्या वर्षी एलन मस्क यांनी ट्विटर ही माइक्रो ब्लॉगिंग कंपनी खरदी केली असून, त्यामध्ये मात्र मस्क यांचे नुकसान होताना दिसत आहे. मात्र, तरीही मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्यात यशस्वी ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

VIDEO: गोव्यात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली पर्यटकांची लूट! कळंगुट, बागा किनाऱ्यावर ट्रान्सजेंडरचा वावर, महिलेने उघड केला धक्कादायक प्रकार

Jeffrey Epstein Files: जेफ्री एप्सटीन फाइल्सचा धमाका! डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स यांच्यासह बड्या हस्तींचे फोटो व्हायरल; 18 वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला VIDEO

SCROLL FOR NEXT