Economy Dainik Gomantak
अर्थविश्व

जगभरात नफ्यात घट होत असताना भारतात का वाढतेय सिगारेट कंपन्यांची कमाई?

तंबाखूजन्य पदार्थांची विक्री कमी करण्यासाठी भारतातही अनेक पातळ्यांवरून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, यादरम्यान सिगारेट कंपन्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे.

दैनिक गोमन्तक

Economy: न्यूझीलंड सरकार तंबाखू उद्योगावर आतापर्यंतचे सर्वात कठोर पाऊल उचलणार आहे. केवळ न्यूझीलंडच (New Zealand) नाही तर जगभरातील अनेक देश तंबाखूच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम आणि आरोग्याच्या (Health) पायाभूत सुविधांवर त्याचा वाढता भार कमी करण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालणार आहेत.

तंबाखूजन्य पदार्थांची विक्री कमी करण्यासाठी भारतातही अनेक पातळ्यांवरून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, यादरम्यान सिगारेट कंपन्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. शेवटी असे काय आहे की एकीकडे सरकार (Government) तंबाखूजन्य पदार्थांचा वापर कमी करण्यासाठी उपाययोजना करत आहे. आणि दुसरीकडे, कंपन्यांच्या प्रॉफीटवर त्याचा कोणताही परिणाम होतांना दिसत नाही.

जगभरात तंबाखूच्या वापराबाबतचे नियम कडक होत आहेत

न्यूझीलंड सरकारने ठरवले आहे की 2027 नंतर 14 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाची मुले सिगारेट खरेदी करू शकणार नाहीत, सरकार किरकोळ विक्रेत्यांची संख्या कमी करण्यासाठी आणि उत्पादनांमधील अंमली पदार्थांचे प्रमाण कमी करण्यासाठी नियम कडक करण्याबाबतही बोलले आहे. सिगारेट आणि तंबाखूचा वापर कमी करण्यासाठी सातत्याने पावले उचलत आहेत. सरकारने आधीच सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांवरील चिन्हांचा आणि सुचनांचा आकार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त, सरकार तंबाखू उत्पादनांवर सर्वोच्च कर (Tax) पातळी आखते. सध्या, तंबाखूची पाने वगळता, इतर सर्व तंबाखू उत्पादने 28 टक्के या सर्वोच्च कर (Tax) स्लॅबमध्ये आहेत. गेल्या महिन्यातच सरकारने सर्व तंबाखू उत्पादनांवरील कराच्या बाबतीत तज्ञांचा एक गट स्थापन केला आहे. ज्यामध्ये आरोग्य, GST, NITI आयोग, CBIC चे सदस्य सहभागी होतील. कर आकारणी करताना तंबाखूजन्य पदार्थांना पाप माल मानले जाते.

सिगारेट कंपन्यांच्या उत्पादनावर कोणताही परिणाम होत नाही

सरकारच्या प्रयत्नांनंतरही सिगारेट कंपन्यांच्या आर्थिक स्थितीवर कोणताही परिणाम होताना दिसत नाही. दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना, या क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी, ITC ने माहिती दिली की, त्यांच्या सिगारेटचे प्रमाण पुन्हा एकदा कोविडच्या पातळीच्या जवळपास पोहोचले आहे. या तिमाहीत सिगारेट विभागाच्या कमाईत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे ती वाढ 5642 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जे कंपनीच्या एकूण स्वतंत्र उत्पन्नाच्या 40 टक्क्यांहून अधिक आहे. या तिमाहीत कंपनीचा नफा सुमारे 14 टक्क्यांच्या वाढीसह सुमारे 3700 कोटी रुपये आहे. ITC ही सिगारेट व्यवसायातील सर्वात मोठी कंपनी आहे आणि या कंपनिचा 78 टक्के बाजार हिस्स्यावर कब्जा आहे.

सरकारच्या कठोरतेनंतर देखील सिगारेट कंपन्या वाढत आहेत

सिगारेट कंपन्यांच्या वाढत्या उत्पन्नामागील मुख्य कारण म्हणजे त्यांची बदलती रणनीती आणि सिगारेट ग्राहकांच्या आवडी-निवडी. कोरोना आणि सरकारच्या कठोर पावलांमुळे सिगारेट कंपन्यांनी आपली विक्री धोरण बदलले आहे. ITC ने किराणा दुकानांवर लक्ष केंद्रित केले आहे. ITC आता या दुकानांपर्यंत पोहोचत आहे. बदलत्या काळाच्या गरजा लक्षात घेत कंपनीने गुंतवणूकदारांसोबतच्या बैठकीत नवीन ब्रँड लॉन्च करत असल्याची माहिती दिली आहे. ग्रोडफ्रे फिलिप्स देशाबाहेरील नवीन बाजारपेठांचा शोध घेऊन विक्री वाढवण्यावर भर देत आहे. एस्कॉर्ट्स सिक्युरिटीचे रिसर्च हेड आसिफ इक्बाल यांच्या मते, 28 टक्के जीएसटी कर असला तरी त्याचा ग्राहकांच्या खिशावर इतका परिणाम होत नाही की ते सिगारेट पूर्णपणे सोडून देतील. याची काही ठोस कारणे आहेत. या मध्ये सहज उपलब्धता आणि सवय ही महत्वाची कारणे आहेत. या कारणांमुळे सिगारेटच्या विक्रीवर विशेष परिणाम होत नाही.

जगभरात तंबाखूच्या वापरात हळूहळू घट होत आहे

जागरूकता व सरकारने उचललेल्या पवलांमुळे तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरात घट झाली आहे. जागतिक आरोग्य संस्थेच्याच्या मते, तंबाखूचा वापर करणाऱ्यांची संख्या 2015 मध्ये 132 कोटींवरून 2020 मध्ये 130 कोटींवर आली आहे. अहवालात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की, 2025 पर्यंत हा आकडा 127 कोटींच्या घरात येऊ शकतो. सध्या दक्षिणपूर्व आशियामध्ये तंबाखू सेवन करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. जेथे एकूण लोकसंख्येपैकी 29 टक्के लोक तंबाखूचे सेवन करतात. संपूर्ण जगात तंबाखू सेवन करणाऱ्यांची टक्केवारी 22.5 इतकी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT