Electric Vehicle Dainik Gomantak
अर्थविश्व

Electric Vehicle: DTC अन् क्लस्टर बसेस लवकरच दिल्लीच्या रस्त्यावर धावणार

दिल्ली सरकारने (Delhi Government) आता महिलांना ई-ऑटो परमिटचे वाटप देखील करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

दिल्लीकरांना सक्षम करण्याच्या प्रयत्नात केजरीवाल सरकारने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. दिल्ली सरकारने (Delhi Government) आता महिलांना ई-ऑटो परमिटचे वाटप करण्यात आले आहे. अर्थातच दिल्लीच्या रस्त्यावर महिला ई-ऑटो चालवताना दिसून येणार आहेत. इतकंच नाही, तर महिलांना स्वयंपूर्ण आणि सक्षम बनवण्यासाठी दिल्ली सरकारने त्यांच्या लायसन्स फीमध्येही देखील सूट दिली आहे. त्याचबरोबर सरकारने महिलांच्या शारीरिक उंचीचे निकषही कमी केले असून तीन वर्षांऐवजी एक महिन्याचे प्रशिक्षण घेऊन महिलांना डीटीसी किंवा क्लस्टर बसही चालवता येणार असल्याचे दिल्ली सरकारने म्हटले आहे. (DTC and cluster buses to run soon Kejriwal government relaxes rules)

दरम्यान, व्यावसायिक वाहने चालवण्यासाठी महिलांना जो परवाना घ्यावा लागत होता, त्याची फी सुमारे 15 हजार रुपये एवढी होती, ती आता सरकारने माफ केली आहे. आता या शुल्काची किम्मत दिल्ली सरकार भरणार आहे. याशिवाय एखाद्या महिलेला डीटीसी किंवा क्लस्टर बस चालवायची असेल तर त्यातही सरकार सवलत देणार असल्याचे म्हटले जात आहे.

पूर्वी डीटीसी किंवा क्लस्टर्स बस चालवण्यासाठी तीन वर्षांचा अनुभव मागीतला जात असत, जी अट सरकारने रद्द केली आहे. आता, दिल्ली सरकारच्या प्रशिक्षण संस्थेत केवळ एक महिना प्रशिक्षण घेऊन परवाना असलेली कोणतीही महिला बस चालवू शकणार आहे. त्यासाठी महिलांना तीन वर्षे वाट पाहावी लागणार नाही. त्याचबरोबर शारीरिक उंचीबाबतच्या अटीही सरकारने महिलांसाठी कमी केल्या आहेत.

तसेच, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी गुरुवारी आयपी डेपोतून इलेक्ट्रिक ऑटो ला हिरवा कंदील दाखवला आहे. विशेष म्हणजे देशातील सर्वाधिक इलेक्ट्रिक ऑटो दिल्लीच्या रस्त्यावर धावणार असल्याचे यावेळी केजरीवाल म्हणाले. दिल्लीत इलेक्ट्रिक ऑटो धावू लागली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी स्वत: 20 ऑटो चालकांना आरसी सुपूर्द केल्या आहेत, त्यासाठी महिला चालकही असणार आहेत.

यावेळी सीएम अरविंद केजरीवाल यांनी ई-ऑटो ड्राइवर सुनीता चौधरी यांना स्टेजवर बोलवून त्यांची ओळख पटवून दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सुनीता 2003 पासून ऑटो चालवत आहेत. पाच वर्षांत ईव्ही पॉलिसीअंतर्गत 45 हजारांहून अधिक लोकांना यामध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत.

शिवाय, जवळपास 19 वर्षांपासून रिक्षा चालवणाऱ्या सुनीता चौधरी यांनी यावेळी सांगितले की, ''ऑटो चालवणे पूर्णपणे सुरक्षित आहे. यामध्ये काही हरकत नाही. ही खूप चांगली गोष्ट आहे. आज ई-ऑटो मिळालेल्या सर्व महिलांचे मी अभिनंदन करतो, आणि मला वाटते की, आज आपल्या सर्वांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Assault Video: पोलिसांनी लाथा घातल्या, मारहाण केली; परेरा मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी निलंबित PSI निलेश वळवईकरांवर गुन्हा दाखल; पुढील तपास सुरु

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

SCROLL FOR NEXT