Dividend income of Indian oil companies is stuck in Russian banks due to sanctions imposed by the West. Dainik Gomantak
अर्थविश्व

भारताचे अब्जावधी रुपये रशियात पडून, तेल कंपन्या चिंतेत

भारतीय तेल कंपन्यांचे लाभांश उत्पन्न रशियाच्या बँकांमध्ये पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे अडकले आहे. भारतीय कंपन्या त्यांच्या अडकलेल्या पैशाचा अनेक पर्यायांद्वारे वापर करण्यासाठी सर्व कायदेशीर मार्ग शोधत आहेत.

Ashutosh Masgaunde

Dividend income of Indian oil companies is stuck in Russian banks due to sanctions imposed by the West:

भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांचे लाभांश उत्पन्न रशियाच्या बँकांमध्ये पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे अडकले आहेत आणि आता ते पैसे रशियाकडून तेल खरेदीसाठी वापरावेत अशी त्यांची इच्छा आहे.

या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की, भारतीय कंपन्या त्यांच्या अडकलेल्या पैशाचा वापर करण्यासाठी सर्व कायदेशीर पर्याय शोधत आहेत.

रशियाने ONGC विदेश (OVL), ऑइल इंडिया (OIL), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (OIC) आणि भारत पेट्रोरेसोर्सेस यांनी एकूण 4900 कोटी रुपये डिव्हिडंड इन्कम रशियाच्या बँक खात्यांमध्ये अडकला आहे. कारण फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे रशियाच्या पेमेंट चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे.

डिव्हिडंड इन्कम म्हणजे तुम्हाला कंपनीचे शेअर्स खरेदी करून मिळणारा पैसा. जर कंपनी नफ्यात असेल तर ती त्या नफ्यातील काही भाग तिच्या भागधारकांना देते.

आता भारतीय कंपन्यांनी त्यांच्या रशियन भागीदारांसोबत डिव्हिडंड इन्कमचा मुद्दा उपस्थित केला आहे. भारत आणि रशियाची सरकारेही या विषयावर चर्चा करत आहेत.

रशिया सध्या भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार आहे. डायरेक्टरेट जनरल ऑफ कमर्शियल इंटेलिजन्स अँड स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार, भारताने जुलै महिन्यात रशियाकडून $3.37 अब्ज डॉलरचे तेल खरेदी केले आहे.

" या गुंतागुंतीच्या प्रकरणात सर्वात व्यावहारिक पर्याय म्हणजे रशियाकडून खरेदी केलेल्या तेलासाठी पेमेंट म्हणून हा डिव्हिडंड इन्कम वापरणे," असे भारतातील सरकारी तेल कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

मात्र यामध्ये अनेक आर्थिक आणि कायदेशीर अडचणी आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी नमूद केले.

कर, लेखाविषयक समस्या आणि आंतरराष्ट्रीय कर अधिकार क्षेत्राशी संबंधित आव्हानांमुळे डिव्हिडंड इन्कमचा पैसा थेट तेलासाठी वापरणे शक्य नाही. आणि भारतीय तेल कंपन्यांना रशियाविरुद्ध पाश्चात्य निर्बंधांचे उल्लंघन करायचे नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT