CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Korean Scientists Innovation: हवामान बदलाचे गंभीर परिणाम आणि वाढते कार्बन उत्सर्जन यामुळे जगभरात चिंता वाढत असतानाच, दक्षिण कोरियातील शास्त्रज्ञांनी एक ऐतिहासिक यश मिळवलं आहे.
CO2 To Alcohol
CO2 To AlcoholDainik Gomantak
Published on
Updated on

सियोल, दक्षिण कोरिया: हवामान बदलाचे गंभीर परिणाम आणि वाढते कार्बन उत्सर्जन यामुळे जगभरात चिंता वाढत असतानाच, दक्षिण कोरियातील शास्त्रज्ञांनी एक ऐतिहासिक यश मिळवलं आहे. त्यांनी कार्बन डायऑक्साइड (CO₂) या प्रमुख हरितगृह वायूचे रूपांतर एका उच्च-मूल्याच्या द्रव रसायनात यशस्वीरित्या करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे

दक्षिण कोरियातील ग्वांगजू इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (GIST) येथील संशोधकांनी हे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. प्रा. जेयॉंग ली, डॉ. मिंजुन चोई आणि डॉ. सून बे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने CO₂ चे रूपांतर थेट अ‍ॅलिल अल्कोहोल या उच्च मूल्याच्या रसायनात करण्याचे नवे इलेक्ट्रोकेमिकल तंत्र विकसित केलं आणि हे मोठं यश मिळवलं आहे.

या क्रांतिकारक संशोधनाचे निष्कर्ष २२ मे २०२५ रोजी "Nature Catalysis" या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शास्त्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. यामुळे जागतिक पातळीवर या संशोधनाची दखल घेतली जात आहे.

CO2 To Alcohol
Goa Politics: केजरीवालांच्‍या ‘एकला चलो’चा गोव्‍यावर परिणाम? राजकीय वर्तुळात चर्चा; युतीशिवाय पर्याय नसल्याचे विरोधकांचे मत

CO₂ चे रूपांतर अ‍ॅलिल अल्कोहोलमध्ये करणे हे दीर्घकाळ संशोधनाचे आव्हान राहिले आहे, कारण यासाठी तीन किंवा अधिक कार्बन अणूंची प्रभावी रचना आवश्यक असते. आजवरची पद्धत ही कमी फॅराडे कार्यक्षमतेची (15% पेक्षा कमी) होती, परंतु GIST टीमच्या नवीन तंत्रज्ञानाने 66.9% कार्यक्षमता साधली, जी एक जागतिक विक्रम मानली जात आहे.

या प्रक्रियेत शास्त्रज्ञांनी कॉपर फॉस्फाइड (CuP₂) व निकेल-लोह (NiFe) उत्प्रेरकांचा उपयोग करून फॉस्फरस-समृद्ध कॉपर उत्प्रेरक तयार केला. हा उत्प्रेरक केवळ कार्यक्षमच नाही, तर उत्पादनात अत्यंत निवडकही आहे. म्हणजेच, इतर कोणतेही अवांछित उप-उत्पादन न बनवता अचूक अपेक्षित रसायन निर्माण करतो.

अ‍ॅलिल अल्कोहोल हे प्लास्टिक, सुगंध, चिकटवता आणि औषधनिर्माण क्षेत्रात वापरले जाणारे अत्यंत महत्त्वाचे रसायन आहे. CO₂ पासून हे थेट तयार होऊ शकणे म्हणजे क्षेत्रासाठी क्रांतीकारक बदल. ही प्रक्रिया द्रव स्वरूपात उत्पादन घेते, जे साठवण्यास व वाहतुकीस सुलभ आहे. हे औद्योगिकीकरणासाठी एक मोठं फायदेचं पाऊल ठरतं.

संशोधकांनी स्पष्ट केले की हे तंत्रज्ञान कोळसा, स्टील आणि पेट्रोकेमिकल क्षेत्रांसाठी नवे दरवाजे उघडते. जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी करत, हे शाश्वत, स्केलेबल आणि पर्यावरणपूरक पर्याय तयार करण्यास सक्षम आहे.

CO2 To Alcohol
Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

“ही प्रक्रिया म्हणजे केवळ वैज्ञानिक यश नाही, तर कार्बन-न्यूट्रल भविष्यासाठी एक निर्णायक टप्पा आहे,” असे प्रा. ली यांनी नमूद केले. CO₂ रूपांतरणातील पारंपरिक C1 आणि C2 लक्ष्यांपेक्षा पुढे जात, हे संशोधन आता C3+ रेणूंवरील भर देत आहे – जे पर्यावरणीय व आर्थिक दोन्हीदृष्ट्या फायदेशीर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com