Digital Payment Dainik Gomantak
अर्थविश्व

Digital Payment करतांना घ्या 'ही' काळजी,अन्यथा बँक अकाउंट होईल रिकामे

तुम्हीही वस्तु खरेदी केल्यावर डिझिटल पेमेंट करत असाल तर ही बातमी पुर्ण वाचा.

Puja Bonkile

Digital Payment: फिजिकल पेमेंटऐवजी लोक आता डिजिटल पेमेंटचा अधिक वापर करता आहेत. या मोडमध्ये तुम्ही सहजपणे कुठेही पेमेंट करू शकता. परंतु ज्या प्रकारे ऑनलाइन पेमेंट वाढत आहे, त्याचप्रमाणे फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. 

अनेक प्रकारे फसवणूक होत आहे. तुम्हीही ऑनलाईन पेमेंट करत असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊया ऑनलाइन फसवणूक कशी टाळायची?

  • ऑनलाइन फसवणूक कशी टाळायची?

ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) टाळण्यासाठी तुम्हाला नेहमी सतर्क राहण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या डिजिटल खात्याचा पासवर्ड नेहमी अपडेट करत राहावे. जेणेकरून कोणीही तुमच्या खात्यात सहज प्रवेश करू शकणार नाही. 

यासोबतच तुम्ही टू-फॅक्टर-ऑथेंटिकेशन सक्रिय ठेवावे. तसेच स्वत:ची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती कोणालाही देऊ नका. तुम्ही तुमच्या खात्यावर नेहमी लक्ष ठेवावे. कोणतेही संशयास्पद पेमेंट दिसल्यास  सर्विस प्रोवाइडरला माहिती द्यावी.

या मार्गांनी होणारी फसवणूक टाळू शकता

  • तुमचे डिव्हाइस आणि पेमेंट अद्ययावत असल्याचे तुम्ही नेहमी सुनिश्चित केले पाहिजे.

  • तुम्ही फक्त विश्वसनीय अॅप्स ॉचा वापर केला पाहिजे. तुम्ही कोणतेही संशयास्पद अॅप्स डाउनलोड करू नका. म्हणूनच तुम्ही फक्त अशी अॅप्स डाउनलोड करावी ज्यांचा सुरक्षिततेचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे.

  • मार्केटमध्ये कोणत्या प्रकारचे घोटाळे होत आहेत याबाबत स्वत:ला अफटेड ठेवावे.

  • जर तुम्ही स्वतःला अपडेट ठेवले तर तुम्ही स्वतःला अनेक फसवणुकीपासून वाचवू शकता.

  • कोणतेही पेमेंट करण्यापूर्वी तुम्ही देय रक्कम आणि पावती तपशील तपासणे आवश्यक आहे. यामुळे तुम्ही चुकीच्या पत्त्यावर पैसे पाठवण्यापासून वाचाल.

  • पेमेंट करतांना सार्वजनिक वाय-फाय वापरणे टाळावे. सार्वजनिक वाय-फाय वापरून अनेक फसवणूक केली जाते. हॅकर्स टाळण्यासाठी तुम्ही नेहमी व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क वापरावे.

  • फसवणुकीच्या व्यवहारांपासून सावध राहावे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अशा फसवणुकीबद्दल सतत माहिती देत ​​असते. आजच्या काळात सामाजिक अभियांत्रिकी तंत्राद्वारे अधिक फसवणूक केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT