Wheat  Dainik Gomantak
अर्थविश्व

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढतेय भारतीय गव्हाची मागणी

केंद्रीय कृषी मंत्रालयानुसार, 2021-22 मध्ये एकूण गहू निर्यातीत 54.50% वाढ झाली आहे.

दैनिक गोमन्तक

रशिया आणि युक्रेन यांच्यात मागील दीड-दोन महिन्यांपासून युध्द सुरु आहे. या युध्दाचे परिणाम आंतरराष्ट्रीय जगतावर होत आहेत. दुसरीकडे मात्र भारताने (India) या युध्दजन्य परिस्थितीमध्येही रशिया (Russia) आणि युक्रेनसह जगातील इतर देशांबरोबर जैसे थे व्यापारी संबंध ठेवले आहेत. यातच आता केंद्रीय कृषी मंत्रालयानुसार, 2021-22 मध्ये एकूण गहू निर्यातीत 54.50% वाढ झाली आहे. (Demand for Indian wheat is increasing in the international market)

कृषी मंत्रालयाच्या (Ministry of Agriculture) आकडेवारीनुसार, 2021-2022 या वर्षात भारताच्या गव्हाच्या निर्यातीने 15428 कोटी रुपयांचे सर्वकालीन उच्च मूल्य गाठले आहे. जे गतवर्षीच्या तुलनेत साडेचार पट अधिक आहे. 2021-22 मध्ये गव्हाची निर्यात 70 लाख टनांवरुन चालू आर्थिक वर्षात 100 लाख टनांपेक्षा जास्त होण्याची आपेक्षा आहे. 2021-22 मध्ये कृषी निर्यातीत, मागील वर्षाच्या तुलनेत, गहू (54.50%), तांदूळ (9.24%), कॉफी (41.15%), फळे आणि भाजीपाला (9.91%), प्रोसेस्ड फूड आयटम्स (22.15%) यासह इतर तृणधान्ये निर्यातीतही मोठी वाढ झाली आहे. 2021-22 मध्ये एकूण कृषी आणि संलग्न क्षेत्राने 24.5% ची वाढ नोंदवली आहे.

दरम्यान, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Union Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांनी गेल्या आठवड्यात माध्यमाशी संवाद साधला. तेव्हा त्यांना विचारण्यात आले की युक्रेन (Ukraine) आणि रशियामधील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गव्हाच्या उपलब्धतेवर विपरीत परिणाम झाला आहे. जागतिक गहू निर्यातीत या दोन देशांचा 29% वाटा आहे… तर तुम्ही याकडे कसे पाहता? यावर ते म्हणाले होते की, ''गव्हाचा प्रश्न आहे तोपर्यंत भारतात पुरेशी उपलब्धता आहे. सध्याच्या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गव्हाची गरज काय आहे. ती पूर्ण करण्यासाठी भारत पूर्णपणे सज्ज आहे. शेतकर्‍यांना चांगली बाजारपेठ मिळावी, त्यांचे उत्पादन आणि पिकाची गुणवत्ता या दोन्ही जागतिक मानवी मानकांशी जुळतील असाच आमचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षी 31 लाख 50 हजार कोटींची कृषी निर्यात झाली आहे. 2021-2022 मध्ये गव्हाच्या निर्यातीत 54.50 टक्के वाढ झाली आहे. जेव्हा निर्यात वाढते तेव्हा शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भावही मिळतो.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना देणार नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: सूर्ल येथे प्रस्तावित ईको टुरिझम प्रकल्पाच्या ठरावाला एकमताने मान्यता

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT