Chitra Ramkrishna Dainik Gomantak
अर्थविश्व

Chitra Ramkrishna: NSE च्या माजी प्रमुखांना दिल्ली HC कडून दिलासा, फोन टॅपिंग प्रकरणात जामीन मंजूर

Chitra Ramkrishna Bail: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांना जामीन मंजूर केला.

Manish Jadhav

Phone Tapping Case: कर्मचार्‍यांच्या बेकायदेशीर फोन टॅपिंगशी संबंधित अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोंदवलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांना जामीन मंजूर केला.

दरम्यान, ईडीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 2009 ते 2017 दरम्यान एनएसई कर्मचार्‍यांच्या (Employees) फोन टॅपिंगशी संबंधित मनी लाँडरिंग प्रतिबंधक प्रकरणात राऊस एव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. रामकृष्ण आणि एनएसईचे रवी नारायण आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

तसेच, आधीच या प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या रामकृष्ण यांना न्यायमूर्ती जसमीत सिंग यांनी जामीन मंजूर केला. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने त्यांना ईडी प्रकरणात जामीन देण्यास नकार दिला होता. 8 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांचे माजी प्रमुख संजय पांडे यांनाही मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणात जामीन मंजूर केला होता.

दुसरीकडे, कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय फोन टॅप करणे किंवा कॉल रेकॉर्ड करणे हे गोपनीयतेचे उल्लंघन आहे, असे न्यायमूर्ती सिंह म्हणाले. न्यायमूर्ती सिंह यांनी नमूद केले की, संमतीशिवाय फोन कॉल टॅप करणे किंवा कॉल रेकॉर्ड करणे हे घटनेच्या कलम 21 नुसार गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Birthday: टाइम्स स्क्वेअरवर पंतप्रधान मोदींचा गौरव! भारतीय समुदायाने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; 140 कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण

Ballaleshwar Ganpati: पालीचा बल्लाळेश्वर भक्ताच्या नावाने का ओळखला जातो? अढळ भक्तीची ही पौराणिक कथा प्रत्येक गणेशभक्ताने जाणून घ्यायलाच हवी

Goa vs Gujarat: अभिनव- सुयश अन् दर्शनचा धूमधडाका! गोव्यानं मारलं मैदान; 8 विकेट्सने गुजरातचा पराभव

Margao Stray Dogs Survey: मडगावातील भटक्या कुत्र्यांची, गुरांची संख्या कळणार; पालिकेकडून प्राणी मॅपिंग मोहिमेला सुरुवात, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

Surya Gochar 2026: बँक बॅलन्स वाढणार अन् व्यवसायात मोठे ऑर्डर मिळणार! शिस्त आणि बुद्धिमत्तेचा महासंयोग; सूर्यदेवाची 'या' राशींवर होणार विशेष कृपा

SCROLL FOR NEXT