RS 2000 Notes Withdraw Dainik Gomantak
अर्थविश्व

RS 2000 Notes Withdraw: 2000 च्या नोटेसंबंधी दिल्ली HC चा मोठा निर्णय, RBI विरोधातील याचिका फेटाळली

RBI: मुख्य न्यायाधीश सतीश कुमार शर्मा आणि न्यायधीश सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली.

Manish Jadhav

Reserve Bank of India: स्लिप न भरता आणि ओळखीच्या पुराव्याशिवाय 2,000 रुपयांच्या नोटा बदलून देण्याच्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

मुख्य न्यायाधीश सतीश कुमार शर्मा आणि न्यायधीश सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या 2,000 रुपयांच्या नोटा स्लिपशिवाय आणि ओळखीच्या पुराव्याशिवाय बदलून देण्याच्या अधिसूचनेला याचिकेत आव्हान देण्यात आले होते.

आरबीआयने सूचनेचा बचाव केला

याचिकाकर्ते आणि अधिवक्ता अश्विनी कुमार उपाध्याय यांनी सांगितले की, या नोटांची मोठी रक्कम एकतर एखाद्या व्यक्तीच्या तिजोरीत पोहोचली आहे किंवा 'फुटीरतावादी, दहशतवादी, माओवादी, ड्रग्ज तस्कर, खाण माफिया आणि भ्रष्ट लोकांकडे' गेली आहे.

ही अधिसूचना मनमानी, तर्कहीन आणि घटनेच्या कलम 14 चे उल्लंघन करणारी आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

दुसरीकडे, नोटबंदी नाही तर वैधानिक कारवाई आहे, असे म्हणत आरबीआयने (RBI) उच्च न्यायालयासमोरील आपल्या अधिसूचनेचा बचाव केला.

तसेच, न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत रिझर्व्ह बँक आणि स्टेट बँकेला 2000 च्या नोटा फक्त संबंधित बँक खात्यातच जमा झाल्याची खात्री करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली होती.

याद्वारे काळा पैसा आणि बेहिशोबी मालमत्ता असलेल्यांची ओळख पटू शकते. 23 मे पासून बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

यापूर्वी, 19 मे रोजी रिझर्व्ह बँकेने 2000 च्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. तुम्ही 30 सप्टेंबरपर्यंत बँकेतून (Bank) 2000 रुपयांच्या नोटा बदलू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya KKR Trade: IPL 2027 आधी मोठा ट्विस्ट! कोलकाताचा नवा 'कॅप्टन' हार्दिक पांड्या? मुंबई इंडियन्सला मोठा धक्का

US Student Visa: अमेरिकेचा भारतीय विद्यार्थ्यांना 'दे धक्का'! स्टुडंट व्हिसा मंजुरीत 62 टक्क्यांची घसरण; रिपोर्टमधून खुलासा

Salman Khan Assam Flood Relief: 'भाईजान' पुन्हा ठरला देवदूत! आसाममधील पूरग्रस्तांसाठी सलमान खान उभारणार 500 घरं; चाहते म्हणाले, 'Real Life Hero'

Budh Guru Yuti 2026: 15 ऑगस्टला घडणार महासंयोग! 'या' 5 भाग्यवान राशींना मिळणार मोठी गुड न्यूज; होणार तगडा धनलाभ

Goa Culture: काकडीचं धार्मिक महत्त्व; गोमंतकीय संस्कृती, लोकपरंपरा आणि आरोग्याशी जोडलेला 3000 वर्षांचा रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT