Cumin seeds Dainik Gomantak
अर्थविश्व

जिऱ्यालाही बसणार महागाईचा तडका, जिऱ्याच्या किमतीत 70 टक्क्यांनी वाढ

बाजार तज्ज्ञांच्या मते येत्या काही महिन्यांत जिरे 20 ते 25 टक्क्यांनी महागण्याची शक्यता

दैनिक गोमन्तक

चौफेर महागाईमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. गेल्या 1 वर्षात देशात सर्वच वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. यामध्ये जिऱ्याचाही (Cumin seeds) समावेश आहे. जिरे देशात मोठ्या प्रमाणात वापरला जातो. त्याच वेळी, उत्पादनात घट झाल्यामुळे निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने यावर्षी जिऱ्याच्या किमतीत सुमारे 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते येत्या काही महिन्यांत जिरे 20 ते 25 टक्क्यांनी महागण्याची शक्यता आहे. (Cumin seeds Price Hike)

भारत हा जगातील सर्वात मोठा जिऱ्याचे उत्पादन करणारा देश आहे. अशा परिस्थितीत भारतात जिऱ्याचे उत्पादन कमी असल्याने जगभरात त्याची किंमत वाढण्याची शक्यता आहे. 19 मे रोजी गुजरातमधील उंझा येथील देशातील सर्वात मोठ्या जिऱ्याच्या बाजारात जिऱ्याची किंमत 195-225 रुपये प्रति किलो होती, तर गेल्या वर्षी याच वेळी त्याची किंमत 140-160 रुपये होती. एवढेच नाही तर साफसफाई, प्रतवारी, पॅकेजिंग आदी केल्यानंतर किरकोळ बाजारात जिरे 275 ते 300 रुपये किलो दराने विकले जात आहेत.

उंझा कृषी उत्पन्न बाजार समितीचे (एपीएमसी) चेअरमन दिनेश पटेल यांच्या म्हणण्यानुसार, “यावर्षी बाजारात कमी जिरे आले आहेत. पूर्वी दरवर्षी जिऱ्याची सरासरी 80-90 लाख पोती (1 पोत्यात 55 किलो) बाजारात येत होती, मात्र यंदा हा आकडा केवळ 50-55 लाख पोते असल्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत जिऱ्याच्या किंमतीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. शेतकरी आता जिऱ्याऐवजी अधिक फायदेशीर पिकांकडे वळल्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केल्या आहे.

दिनेश पटेल यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन-चार वर्षांपासून जिऱ्याचा भाव 130 ते 150 रुपये प्रतिकिलोपर्यंत राहिला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी यावेळी रब्बी हंगामात अधिक नफ्यासाठी जिऱ्याऐवजी मोहरी, कापूस, भुईमूग, सोयाबीन, धणे आदी पिके घेण्याचा पर्याय निवडला. एवढेच नाही तर यंदा हवामानही जिरे पिकासाठी अनुकूल नसल्याने जिऱ्याचे उत्पादन 25 टक्क्यांहून अधिक घटले, असा अंदाज पटेल यांनी लावला आहे.

जिरे 300 रुपये प्रतिकिलो होणार

उंझा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष अरविंद पटेल सांगतात की, आगामी मान्सूनचा हंगामही कमकुवत राहिला, तर या वर्षाच्या उत्तरार्धात जिऱ्याचा स्पॉट भाव 300 रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतो. जिऱ्याची लागवड ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये सुरू होते, तर त्याची काढणी फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान होते. गुजरात व्यतिरिक्त राजस्थान हे जिरे लागवडीचे केंद्र आहे. उंझा मंडीत सुमारे 60 टक्के जिरे राजस्थानमधून येतात, तर 40 टक्के गुजरातमधून येतात.

कमी जमिनीवर शेती

गुजरातमधील साबरकांठा, बनासकांठा, सौराष्ट्र आणि कच्छ भागात जिऱ्याची लागवड केली जाते. त्याच वेळी, त्याचे पीक राजस्थानच्या जोधपूर, नागौर, जैसलमेरमध्ये घेतले जाते. उंझा मंडईत दोन्ही राज्यातील शेतकरी आणि व्यापारी आपली पिके विकण्यासाठी येतात.मनी कंट्रोलने दिलेल्या अहवालानुसार, गुजरातमध्ये या वर्षी शेतकऱ्यांनी 3 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर जिऱ्याची लागवड केली होती, जी गेल्या वर्षी 4.70 लाख हेक्टर होती. राजस्थानमध्येही यावर्षी जिऱ्याच्या लागवडीखालील क्षेत्र 20.25 टक्क्यांनी घटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT