इंडोनेशियाच्या निर्णयामुळे भारताला दिलासा, खाद्यतेलाच्या किमती होऊ शकतात कमी

Palm Oil Price: इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याची घोषणा केली आहे.
palm oil
palm oil Dainik Gomantak
Published on
Updated on

इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याची घोषणा केली आहे. अध्यक्ष जोको विडोडो यांनी सांगितले की सोमवार, 23 मे पासून बंदी उठवली जाईल. या निर्णयाचा फायदा भारताला मिळण्याची अपेक्षा आहे. (indonesia lift palm oil export ban monday know how good news for india)

भारत (India) इंडोनेशियामधून पाम तेलाचा मोठा भाग आयात करतो, परंतु पूर्वी इंडोनेशियाने देशांतर्गत किमती नियंत्रित करण्यासाठी इतर देशांना पामतेल देण्यास नकार दिला होता. आता परिस्थिती सुधारल्याने इंडोनेशिया 23 मे पासून पाम तेलवारील निर्यात बंदी उठवणार आहे.

इंडोनेशिया पाम तेलाचा (Oil) जगातील सर्वात मोठा उत्पादक आहे आणि भारताच्या वार्षिक गरजांपैकी 50 टक्के गरजा पूर्ण करतो. भारतीय घरांमध्ये पाम तेल थेट स्वयंपाकात वापरले जात नाही, परंतु त्याचा वापर सर्वत्र केला जातो. खाद्यतेल ते सौंदर्य प्रसाधने, साबण, डिटर्जंट यासारख्या FMCG उत्पादनांमध्येही पाम तेलाचा वापर केला जातो.

palm oil
लाँच झाली तिसरी इलेक्ट्रिक स्कूटर, किंमतच नव्हे फीचर्ससुद्धा आहेत जबरदस्त

सरकारवर दबाव होता

पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी आल्यापासून इंडोनेशिया (indonesia) सरकारवर दबाव होता. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी धरणे व निदर्शनेही केली. इंडोनेशियन ऑइल पाम फार्मर्स असोसिएशनचे अध्यक्ष गुलाट मानुरंग म्हणाले की, स्वयंपाकाच्या तेलाच्या देशांतर्गत किमतीला आळा घालण्यासाठी निर्यातबंदीमुळे जवळपास 16 दशलक्ष शेतकऱ्यांसाठी आर्थिक संकट निर्माण झाले आहे. बंदी असूनही, देशात स्वयंपाकाचे तेल 14,000 रुपये (96 सेंट) प्रति लीटर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com