DA hike for central government employees Dainik Gomantak
अर्थविश्व

DA Hike: सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना केंद्र सरकारची मोठी दिवाळी भेट; महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला

DA hike 2025 news: महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ झाल्याने सरकारवर वार्षिक १०,०८४ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारने ३ टक्के महागाई भत्ता वाढवण्यास मान्यता दिली आहे. या वाढीसह एकूण महागाई भत्ता आता ५५ वरून ५८ टक्के झाला आहे. या निर्णयाचा फायदा सुमारे १.१५ कोटी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे.

महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ झाल्याने सरकारवर वार्षिक १०,०८४ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. महागाई भत्ता (DA) आणि DR हे पगार आणि पेन्शनचे महत्त्वाचे घटक आहेत. सरकार वर्षातून दोनदा - जानेवारी आणि जुलैमध्ये - या भत्त्यांमध्ये सुधारणा करत असते.

सरकारी कर्मचारी जुलैपासून या केंद्र सरकारच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान, दिवाळीच्या काही दिवस आधी सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी भेट दिली आहे.

महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढल्याने दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना मोठा लाभ होणार आहे. समजा कर्मचाऱ्याचे वेतन ६० हजार रुपये एवढे असून, त्याला ३३००० एवढा डीए मिळतो, तर तीन टक्के वाढीसह आता त्या कर्मचाऱ्याला ३४,३०० रुपये मिळतील याचा अर्थ कर्मचाऱ्याला १,८०० रुपये महागाई भत्ता वाढला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारतात DPDP कायदा लागू, Social Mediaवरील नियम अधिक कठोर होणार, काय बदल होतील? जाणून घ्या

Pooja Naik: पुलिस आमचें Useless, 'त्या' तपास अधिकाऱ्यावरच 5 लाचखोरीचे गुन्हे; तपास कसा होणार? विजय सरदेसाई संतापले

Rishabh Pant: ऋषभ पंतचा 'पॉवर शो'! 102 मीटरचा षटकार ठोकत बनला नवा 'सिक्सर किंग', सेहवागचा रेकॉर्ड ब्रेक Watch Video

Goa Vs Rajasthan Tourism: पधारो म्हारो देस! संस्कृती दाखवणारे राजस्थानचे पर्यटन; गोव्याने ही कला शिकण्यासारखी..

Arambol: '..गावकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही'! आरोलकरांचे प्रतिपादन; हरमलच्या जमीन रूपांतरणास कडाडून विरोध

SCROLL FOR NEXT