DA Hike | Money Dainik Gomantak
अर्थविश्व

DA Hike News: सरकारी कर्मचारी मालामाल, महागाई भत्त्यात तब्बल एवढ्या टक्क्यांची वाढ; पगार आता...!

6th Pay Commission: तुम्ही स्वतः सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी विभागात काम करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

Manish Jadhav

6th Pay Commission: तुम्ही स्वतः सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी विभागात काम करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. होय, हरियाणा सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी घोषणा केली आहे.

सरकारने महागाई भत्ता (Dearness Allowance) आणि महागाई सवलत (Dearness Relief) एकाच वेळी नऊ टक्क्यांनी वाढवली आहे. वित्त विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये, DA/DR 212 टक्क्यांवरुन 221 टक्के झाला आहे.

जानेवारीपासून वाढीव DA/DR चा लाभ

अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीपासून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीव डीएचा लाभ दिला जाणार आहे. म्हणजेच, जुलैमध्ये येणार्‍या जून महिन्याच्या पगार आणि पेन्शनसोबतच कर्मचाऱ्यांची (Employees) पाच महिन्यांची थकबाकीही देण्यात येणार आहे.

हरियाणातील सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू आहे. त्याचवेळी, काही राज्य कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगांतर्गत वेतन मिळत आहे. सहाव्या वेतन आयोगानुसार पगार काढणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा निर्णय लागू होणार आहे.

2.85 लाख कर्मचाऱ्यांना लाभ झाला

दुसरीकडे, मे महिन्याच्या सुरुवातीला राज्य सरकारने सातव्या वेतन आयोगाअंतर्गत डीए आणि डीआरमध्ये 4 टक्के वाढ करण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर सातव्या वेतन आयोगानुसार पगारदारांचा डीए 42 टक्के झाला होता.

सरकारने (Government) जानेवारी महिन्यापासून कर्मचाऱ्यांना हा लाभ दिला होता. या घोषणेमुळे 2 लाख 85 हजार कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यात आली. त्याचबरोबर, 2 लाख 65 हजार पेन्शनधारकांनाही याचा लाभ झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT