Cyrus Mistry Twitter
अर्थविश्व

Cyrus Mistry: उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू, पालघर जिल्हा अधीक्षकांची माहिती

उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघात आज दुपारी सव्वा तीनच्या दरम्यान झाला. पालघर जिल्हा अधीक्षकांनी ही माहिती दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Cyrus Mistry: प्रसिध्द उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला. उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघात आज दुपारी सव्वा तीनच्या दरम्यान झाला. पालघर जिल्हा अधीक्षकांनी ही माहिती दिली आहे. सायरस मिस्त्री यांचे पालघरच्या चारोटी येथे अपघाती निधन झाले. मिस्त्री यांनी 2019 साली टाटा समूहाचे नेतृत्व केले होते.

पालघर मधील चारोटी नाक्यावर हा अपघात झाला. गाडी भरधाव वेगाने होती, त्यानंतर कार दुभाजकावर आदळली, त्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. ही कार अहमदाबादहून मुंबईला जात होती.

रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यात बराच काळ वाद होता. डिसेंबर 2012 मध्ये रतन टाटा यांनी सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाचे अध्यक्ष बनवले. 2016 मध्ये त्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले होते. त्यांना अचानक पदावरून काढून टाकण्यात आल्याने त्यांनी न्यायालयातही धाव घेतली होती आणि ते नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये गेले होते जिथे निर्णय त्यांच्या बाजूने आला होता. मात्र, या निर्णयानंतर रतन टाटा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT