अर्थविश्व

Cyrus Mistry जीवन परिचय! शिक्षण, व्यवसाय, संपत्ती आणि कुटुंबाची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि शापूरजी-पालनजी समुहाचे (Shapoorji Pallonji Group) वारसदार सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) (वय 54) यांचे पालघरच्या चारोटी येथे अपघाती निधन झाले. रविवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास अहमदाबाद-मुंबई रस्त्यावर सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाला. सायरस मिस्त्री हे एक यशस्वी उद्योजक होते.

सायरस मिस्त्री यांचे पूर्ण नाव सायरस पालनजी मिस्त्री (Cyrus Pallonji Mistry) असे होते. सायरस मिस्त्री यांचा जन्म 04 जुलै 1968 रोजी झाला होता. टाटा समूहाचे (Tata Group) माजी अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना टाटा अँड सन्सचे अध्यक्ष केले तेव्हा सायरस प्रसिद्धीच्या झोतात आले. द इकॉनॉमिस्टने त्यावेळी सायरस यांचे वर्णन जगातील सर्वात महत्त्वाचे उद्योगपती असे केले होते.

शिक्षण (Education Of Cyrus Mistry)

सायरस मिस्त्री यांनी त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून पूर्ण केले. 1990 मध्ये त्यांनी इंपीरियल कॉलेज ऑफ लंडनमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आणि 1996 मध्ये लंडन स्कूल ऑफ बिझनेसमधून (London School Of Business) व्यवस्थापन विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली.

उद्योजक म्हणून प्रवास (Cyrus Mistry As Businessman)

सायरस मिस्त्री यांनी कौटुंबिक बांधकाम व्यवसाय "शापूरजी पालनजी अँड कंपनी" (Shapoorji Pallonji Group) यातून आपला प्रवास सुरू केला. 1991 मध्ये सारयस या कंपनीत संचालक म्हणून नियुक्त झाले.

सायरस मिस्त्री 1 सप्टेंबर 2006 रोजी टाटा सन्स (Tata Sons) समूहात सामील झाले, 2013 मध्ये त्यांना टाटा समूहाच्या (Tata Group) अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. परंतु 24 ऑक्टोबर 2016 रोजी त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आले आणि रतन टाटा पुन्हा टाटा समूहाचे अध्यक्ष बनले.

टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा सायरस यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला होता. बॉसुशासन आणि पारदर्शकी व्यवस्थापनाचा आग्रह धरणाऱ्या सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहावर गंभीर आरोप केले होते. टाटा समूहाला 2019 मध्ये 13 हजार कोटींचा तोटा झाला होता. मात्र तो त्यांनी लपवला, असा आरोप मिस्त्री यांनी केला होता.

संपत्ती (Cyrus Mistry Networth)

सायरस मिस्त्री यांची एकूण संपत्ती 29 अब्ज डॉलर आहे. त्यांच्यानंतर त्यांची पत्नी आणि दोन मुले त्यांचे वारसदार आहेत.

तसेच, सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे 18.5 टक्के स्टेकहोल्डर होते, इतर कोणाचाही इतका मोठा हिस्सा नव्हता. सायरस मिस्त्री सध्या त्यांच्या मूळ कंपनी शापूरजी पालोनजी अँड कंपनी (मिस्त्री शापूरजी पालोनजी अँड कंपनी) चे प्रमुख होते.

कुटुंब (Cyrus Mistry Family Details)

सायरस मिस्त्री यांनी प्रसिद्ध वकील इक्बाल छागला (Lawyer Iqbal Chagla) यांची मुलगी रोहिक्या छागला (Cyrus Mistry Wife Rohiqa Chagla) यांच्याशी लग्न केले. सायरस मिस्त्री यांच्याकडे भारतासह आयरिश नागरिक्तव होते.

सायरस आणि रोहिक्या यांना फिरोज मिस्त्री आणि जहाँन मिस्त्री (Cyrus Mistry Son Firoz And Zahan Mistry) अशी दोन मुले आहेत.

दोनच महिन्यापूर्वी झाले होते वडील पालोनजी मिस्त्री

सायरस मिस्त्री यांचे वडील आणि उद्योजक पालोनजी मिस्त्री (Pallonji Mistry) यांचे निधन झाले होते. 28 जून 2022 रोजी मुंबईत पालोनजी मिस्त्री यांचे निधन झाले. त्यानंतर दोनच महिन्यात सायरस मिस्त्री यांचे देखील निधन झाल्याने सर्वस्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT