Cement  Dainik Gomantak
अर्थविश्व

Cement Price to Reduce: स्वप्नातील घर बांधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, एवढ्या रुपयांनी स्वस्त होणार सिमेंट!

Cement Price Latest Update: जर तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर बांधण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंदित करेल.

Manish Jadhav

Cement Price Latest Update: जर तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर बांधण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंदित करेल. होय, लवकरच सिमेंटच्या किमती 10 ते 12 रुपयांनी कमी होऊ शकतात.

मागणी असूनही वाढलेल्या स्पर्धेमुळे चालू आर्थिक वर्षात सिमेंट कंपन्या एक ते तीन टक्क्यांनी (रु. 10 ते 12) किमती कमी करु शकतात. ही शक्यता एका अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. क्रिसिल रेटिंग्सने अहवालात म्हटले आहे की, सिमेंट उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती घसरल्याने सिमेंटच्या किमती कमी होऊ शकतात.

दरवाढ थांबताना दिसत आहे

गेल्या आर्थिक वर्षात सिमेंटने प्रति बॅग 391 रुपयांची विक्रमी पातळी गाठली होती. अहवालानुसार, कोरोना महामारीमुळे (Corona Epidemic) निर्माण झालेल्या गतिरोध व्यतिरिक्त, कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ आणि रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने या दरवाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

मात्र, चालू आर्थिक वर्षात सिमेंट उद्योगातील स्पर्धा तीव्र झाल्यामुळे आणि निविष्ठा खर्चात नरमता आल्याने दरवाढीची प्रक्रिया थांबलेली दिसते.

घर बांधणाऱ्यांना दिलासा मिळणार

शिवाय, या वर्षी सिमेंटच्या किरकोळ किमतीत एक ते तीन टक्क्यांनी घट होण्याची शक्यताही अहवालात वर्तवण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत सिमेंटच्या किमती सुमारे एक टक्क्याने कमी होऊन सरासरी 388 रुपये प्रति बॅगवर आल्या होत्या.

सिमेंटचे भाव 3 टक्क्यांनी घसरले तर 10 ते 12 रु. त्यानुसार घर बांधणाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

तसेच, क्रिसिल MI&A रिसर्चने या आर्थिक वर्षात निवडणुकांपूर्वी (Election) सिमेंटची मागणी दरवर्षी 8-10% वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, यामुळे किंमत वाढणार नाही.

2023 च्या सुरुवातीपासून सिमेंटच्या किमतीत नरमाईची चिन्हे दिसत आहेत. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव चढेच आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

SCROLL FOR NEXT