Congress Dainik Gomantak
अर्थविश्व

महागाईच्या मुद्यावरुन Congress आक्रमक, 5 ऑगस्टला घालणार पंतप्रधान भवनाला घेराव

Inflation: वाढत्या महागाईच्या मुद्यावरुन काँग्रेसने पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचे जाहीर केला आहे.

दैनिक गोमन्तक

Prime Minister's House: वाढत्या महागाईच्या मुद्यावरुन काँग्रेसने पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचे जाहीर केला आहे. काँग्रेसने निवेदनात म्हटले आहे की, '5 ऑगस्ट रोजी कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्ते या मुद्द्यावरुन पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालतील.' काँग्रेसने आपल्या खासदार, आमदारांना गावात आणि छोट्या शहरात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही या आंदोलनात सहभागी होण्यास सांगितले आहे.

दरम्यान, महागाई (Inflation) आणि वाढत्या किमतीच्या विरोधात राज्याच्या राजधानीत काँग्रेसने (Congress) राजभवनावर घेराव घालण्याचे नियोजन केले आहे. या आंदोलनादरम्यान राज्यातील आमदार, माजी खासदार आणि ज्येष्ठ नेत्यांना राजभवनाच्या घेरावात सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे.

दुसरीकडे, लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना 'चलो राष्ट्रपती भवन'च्या नावाने महागाई आणि बेरोजगारीविरोधात आंदोलन करण्यास सांगण्यात आले आहे. नवी दिल्लीत पक्षाच्या वतीने पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा घेराव घालण्याची योजना आहे. या निदर्शनादरम्यान काँग्रेस कार्यकारिणीसह सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

शिवाय, 25 एप्रिलपासून पामतेलाच्या किमतीत 10 टक्क्यांनी घट झाल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. 25 एप्रिल रोजी त्याची किंमत 154 रुपये प्रति लिटर होती, जी आता 25 जुलै रोजी 138 रुपयांवर आली आहे. या क्रमाने सोयाबीन तेल 165 रुपये (25 एप्रिल रोजी) वरुन 160 रुपये (25 जुलै रोजी) पर्यंत खाली आले आहे. सूर्यफूल तेल 188 रुपये (25 एप्रिल) वरुन 183 रुपये (25 जुलै), मोहरीचे तेल 184 रुपये (25 एप्रिल) वरुन 174 रुपये (25 जुलै), वनस्पति तूप 159 रुपये (25 जुलै) (25 एप्रिल भाव ) 157 रुपये (25 जुलै किंमत) पर्यंत खाली आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT