दिवाळीपूर्वीच सर्व सामान्यांना महागाईचा मोठा धक्का बसला आहे.देशातील सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (Oli Company) 1 नोव्हेंबरपासून एलपीजी गॅस (LPG Gas) सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (Indian Oil corporation) ने 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (Commercial Gas cylinder)किंमतीत तब्बल 268 रुपयांनी वाढ केली आहे. देशाची राजधानी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 264 रुपयांनी वाढ झाली आहे.(Commercial LPG Gas cylinder price hiked by 268 rupees know about LPG Gas Price Today)
तथापि, तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांच्या वापरासाठी 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणतीही वाढ केलेली नाही. त्याच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत 14.2 किलोच्या विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 899.50 रुपयांवर कायम आहे. गेल्या महिन्यात तेल कंपन्यांनी अनुदानाशिवाय 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 15 रुपयांनी वाढवली होती.
दिल्लीत आता अनुदान नसलेल्या 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 899.50 रुपये आहे. कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत 926 रुपये, मुंबईत 899.50 रुपये आहे. चेन्नईमध्ये विनाअनुदानित सिलिंडरची किंमत आता 915.50 रुपये झाली आहे.
दुसरीकडे व्यवसायिक गॅसचा विचार करता दिल्लीत 19 किलो व्यावसायिक गॅसची किंमत 2645 रुपयांनी वाढून 2000.50 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 268 रुपयांनी वाढून 2073.5 रुपये झाली आहे. यापूर्वी त्याची किंमत 1805.50 रुपये होती.
मुंबईतील कमर्शियल गॅसच्या दरात 265 रुपयांनी वाढ होऊन त्याची किंमत 1950 रुपयांवर गेली आहे. यापूर्वी ही किंमत 1685 रुपये होती.त्याच वेळी, चेन्नईमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 265.50 रुपयांनी वाढून 2133 रुपये झाली आहे. आधी किंमत 1867.5 रुपये होती.
आपल्या शहरातील आजची एलपीजी सिलिंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. येथे कंपन्या दर महिन्याला नवीन दर जारी करतात. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर तुम्ही तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरची किंमत तपासू शकता.
दरम्यान आजपासून LPG गॅस वितरण प्रणालीमध्ये देखील मोठे बदल झालेले पाहायला मिळत आहेत. एलपीजी गॅस सिलिंडर वापरतात त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे ज्यांना गॅस एजन्सीच्या विक्रेत्याकडून एलपीजी सिलिंडर घरपोच मिळेल, त्यांना पुढील महिन्यापासून नवीन नियमांनुसार या सेवेचा लाभ मिळू शकेल. नवीन नियम असा असेल की आता ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो OTP गॅस विक्रेत्याला सांगावा लागेल. या ओटीपीच्या आधारे एलपीजी सिलिंडर घरपोच दिला जाईल.म्हणजेच गॅस डिलिव्हरी घेताना तुम्हाला आता एक OTP देणे अनिवार्य असणार आहे.
या नवीन बदलाला डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (डीएसी) असे नाव देण्यात आले आहे. सिलिंडर योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचावा आणि सिलिंडरचा काळाबाजार रोखता यावा यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याआधी कुणाचा सिलिंडर दुसऱ्याला चढ्या किमतीत विकला जात होता, मात्र ओटीपी सुरू केल्याने असे होणार नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.