China Taiwan Crisis 2022 Dainik Gomantak
अर्थविश्व

China Taiwan Crisis 2022: तैवानमध्ये युद्ध सुरू झाल्यास कार अन् मोबाइल कंपन्या येणार अडचणीत

अमेरिकेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या नुकत्याच झालेल्या तैवान दौऱ्यामुळे पुन्हा एकदा आंतरारष्ट्रीय संकट ओढवले आहे.

दैनिक गोमन्तक

China Taiwan Crisis 2022: चीन आणि तैवान (China Taiwan Crisis 2022) यांच्यातील अनेक दशकांपासून सुरू असलेला संघर्ष गेल्या काही दिवसांपासून शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी (US Speaker Nancy Pelosi) यांच्या नुकत्याच झालेल्या तैवान दौऱ्यामुळे पुन्हा एकदा संकट ओढवले आहे. (Nancy Pelosi Taiwan Visit)

या भेटीचे वृत्त समोर आल्यापासून चीन सातत्याने इशारे देत होता आणि आता तैवानच्या आखातात युद्ध सुरू होणार नाही ना, अशी भीती अधिक गडद झाली आहे. या सर्व घडामोडींदरम्यान जगाला आणखी एक चिंतेची बाब सतावत आहे. आधीच ऑटो इंडस्ट्रीपासून ते स्मार्टफोन इंडस्ट्रीपर्यंत चिपच्या कमतरतेमुळे त्रस्त आहेत. तैवानमधील परिस्थिती आणखी बिघडल्यास हे संकट अधिक गंभीर होऊ शकते कारण हा छोटा देश सेमीकंडक्टरच्या (Semiconductor) बाबतीत जगाचा कारखाना आहे.

अशा प्रकारे सेमीकंडक्टर क्रांतीची सुरुवात झाली

सेमीकंडक्टरच्या बाबतीत तैवानचा उदय 1985 साली झाला. तैवान सरकारने मॉरिस चांग यांना त्यांच्या देशातील उदयोन्मुख सेमीकंडक्टर उद्योग विकसित करण्यासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करण्याचे काम दिले. यानंतर, 1987 मध्ये, तैवान सरकार, मॉरिस चांग, ​​चांग चुन मोई आणि त्सेंग फॅन चेंग यांनी मिळून 'तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी' स्थापन केली. आज ही जगातील सर्वात मोठी सेमीकंडक्टर कंपनी आहे. सेमीकंडक्टर्सच्या बाबतीत या कंपनीच्या वर्चस्वाचा अंदाज या वस्तुस्थितीवरून लावला जाऊ शकतो की TSMC एकेकाळी जागतिक बाजारपेठेच्या 92 टक्के मागणी पूर्ण करत होती. त्याच वेळी, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगची भागीदारी केवळ 8 टक्क्यांपर्यंत मर्यादित होती.

जगातील मोठ्या कंपन्या तैवानवर अवलंबून आहेत

2020 मध्ये कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर, तैवानच्या सेमीकंडक्टर उद्योगावर वाईट परिणाम झाला. मात्र, त्यानंतरही सेमीकंडक्टर उद्योगात तैवानचा दबदबा कायम आहे. तैपेई-आधारित रिसर्च फर्म ट्रेंडफोर्सच्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये सेमीकंडक्टर उद्योगाच्या एकूण जागतिक कमाईमध्ये तैवानच्या कंपन्यांचा वाटा 60 टक्क्यांहून अधिक होता. यामध्ये टीएसएमसीने सर्वाधिक योगदान दिले. TSMC ही अजूनही जगातील सर्वात मोठी सेमीकंडक्टर कंपनी आहे आणि Apple, Qualcomm, Nvidia, Microsoft, Sony, Asus, Yamaha, Panasonic सारख्या दिग्गज कंपन्या तिचे ग्राहक आहेत.

या गोष्टींमध्ये सेमीकंडक्टरचा वापर केला जातो

सेमीकंडक्टरचा वापर इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, स्मार्टफोन, कार सेन्सरमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. सेमीकंडक्टर उत्पादन हे एक कठीण काम आहे, डिझाइन कंपन्यांपासून ते उत्पादन कंपन्यांपर्यंत या चिप्स प्रोवाईड केल्या जातात. याशिवाय सेमीकंडक्टर उद्योगाच्या नेटवर्कमध्ये साहित्य आणि यंत्रसामग्रीचा पुरवठा करणाऱ्या तंत्रज्ञानाचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचा समावेश होतो. तैवानची आघाडीची सेमीकंडक्टर कंपनी TSMC मुख्यत्वे उत्पादनावर लक्ष केंद्रित करते. TSMC चे महत्त्व यावरून देखील समजू शकते की सॅमसंग सोबतच जगातील सर्वात प्रगत 5-नॅनोमीटर चिप्स बनवणाऱ्या मोजक्या कंपन्यांपैकी दोन आहेत.

सेमीकंडक्टर्सच्या बाबतीत तैवान चीनपेक्षा पुढे

चीनबद्दल बोलायचे झाले तर ते तैवानच्या मागे आहे. 2020 मध्ये तैवानची TSMC कमाईच्या बाबतीत पहिल्या स्थानावर होती. दुसऱ्या क्रमांकावर आणखी एका तैवानच्या यूएमसी कंपनीने कब्जा केला. दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग तिसऱ्या स्थानावर होती. त्यानंतर अमेरिकन कंपनी ग्लोबल फाउंड्रीज चौथ्या स्थानावर होती. चीनी कंपनी SMIC ही अर्धसंवाहक उद्योगात पाचव्या क्रमांकाची कंपनी होती. सध्या TSMAC कोरोना महामारीच्या काळात चिपच्या कमतरतेनंतर इतर अनेक देशांमध्ये प्लांट उभारत आहे. यासाठी या तैवानच्या कंपनीने Wafer Tech, Acer, WSMC, Apple यांसारख्या कंपन्यांशी करार केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT