Auto Dainik Gomantak
अर्थविश्व

Delhi NCR: डिझेल ऑटो लवकरच होणार बंद, या योजनेवर सरकार करतेय काम

E-Auto: केंद्राच्या वायु गुणवत्ता आयोगाने उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थानला 2026 च्या अखेरीस डिझेल ऑटो बंद करण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

E-Auto: केंद्राच्या वायु गुणवत्ता आयोगाने उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थानला 2026 च्या अखेरीस डिझेल ऑटो बंद करण्यास सांगितले आहे. या आदेशानंतर एनसीआरच्या रस्त्यांवरुन डिझेल वाहने हटवण्यात येणार आहेत. वायु गुणवत्ता आयोगाने या राज्यांना 1 जानेवारी 2023 पासून फक्त ई-ऑटोची नोंदणी करण्यास सांगितले आहे. सरकारची योजना अशी आहे की, जानेवारी 2027 पासून एनसीआरमध्ये फक्त ई-ऑटो चालतील.

काय म्हटले होते आदेशात?

बुधवारी जारी केलेल्या आदेशात, वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने म्हटले की, 1 जानेवारी 2027 पासून एनसीआरमध्ये फक्त सीएनजी आणि ई-ऑटो चालवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आयोगाने तीन राज्यांना 1 जानेवारीपासून एनसीआरमध्ये फक्त सीएनजी (CNG) आणि ई-ऑटोची नोंदणी सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आणि 2026 च्या अखेरीस डिझेल ऑटो बंद करण्याचे निर्देश दिले.

दुसरीकडे, एनसीआरमध्ये दिल्ली, हरियाणाचे 14 जिल्हे, उत्तर प्रदेशचे आठ जिल्हे आणि राजस्थानचे दोन जिल्हे समाविष्ट आहेत. दिल्लीत (Delhi) 1998 मध्ये डिझेल ऑटो रिक्षा सीएनजीमध्ये रुपांतरित करण्याचा कार्यक्रम सुरु करण्यात आला. सध्या दिल्लीत डिझेलवर चालणाऱ्या वाहनांची नोंदणी झालेली नाही. दिल्ली परिवहन विभागाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 4,261 ई-ऑटोच्या नोंदणीसाठी एक योजना सुरु केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT