workers  Dainik Gomantak
अर्थविश्व

ग्रामीण रोजगार योजनेसाठी सरकार देणार 12,000 कोटी रुपये अतिरिक्त

केंद्र सरकार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसह सरकारी योजनांवर अतिरिक्त खर्चासाठी 12,000 कोटी देण्याचे केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

केंद्र सरकार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसह सरकारी योजनांवर अतिरिक्त खर्चासाठी 12,000 कोटी देण्याचे केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे.

ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पांत सुधारित 98,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची आवश्यकता असेल. वित्त मंत्रालयाच्या यंदाजानुसार, योजनेसाठी आणखी 8,000-9,000 कोटी रुपयांची आवश्यकता असू शकते. खत अनुदानासाठी आणि अन्न आणीसर्वजणीक वितरण विभागाकडून बाहेर पडणाऱ्या प्रवाहात वाढ होण्याचीही मंत्रालयाला अपेक्षा आहे. तथापि अधिकाऱ्यांनी सांगितले की हे अतिरिक्त खर्च सोईच्या पातळीवर होते आणि ते 12 000 कोटी रुपयापर्यंत मर्यादित केले जातील.काही योजनाना RE( Revised Estimate) पेक्षा जास्त गरज असू शकते. परंतु त्या 12, 000 कोटी रुपयांच्या खाली असतील आणि आवश्यक असल्यास, आम्ही आकस्मिक निधी वापरू शकतो, वित्त मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ETला सांगितले.

राज्यघटनेनुसार कोणत्याही आपत्कालीन परिस्थितिला सामोरे जाण्यासाठी भारताच्या आकस्मित निधी अंतर्गत एक कॉर्पस तयार करणे अनिवार्य आहे. शेवटच्या केंद्रीय अर्थसंकल्पांत,(Budget) सरकारने महामारी लक्षात घेवून वित्त विधेयक 2021 च्या माध्यमातून आकस्मित निधी 500 कोटी रुपयावरुन 30,000 कोटी रुपयापर्यंत वाढवला.

दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की प्रत्येक वाढीव वाटपाची त्याच्या वापरासाठी छाननी केली जाईल. चालू वर्षासाठी ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील खर्च 19 राज्यांनी ओव्हरशॉट केला आहे आणि 21 फेब्रुवारीपर्यंत योजनेवरील एकूण खर्च 102. 39 % इतका वाढला आहे. इतर राज्यांनीही अधिक निधी उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.

केंद्राने सुधारित अंदाजानुसार 2021 -2022 साठी मनरेगासाठीची तरतूद 73, 000 कोटी रुपयावरुण 98,000 कोटी रुपयापर्यंत वाढवली आहे. 2020- 2021साठी खर्च 1.11 लाख कोटी रुपये इतका होता. अर्थमंत्री निर्मल सीतारामन यांनी "मागणी झाल्यास" योजनेसाठी वाटप वाढवले जाईल असे सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT