Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

आनंदाची बातमी! प्रधानमंत्री ज्ञानवीर योजनेंतर्गत केंद्र सरकार देणार 3400 रुपये?

केंद्र सरकारकडून अनेक सरकारी योजना राबवल्या जात असून, त्याअंतर्गत आर्थिक मदत दिली जाते.

दैनिक गोमन्तक

PIB Fact Check: केंद्र सरकारकडून अनेक सरकारी योजना राबवल्या जात असून, त्याअंतर्गत आर्थिक मदत दिली जाते. शेतकरी, महिला, मुली आणि तरुणांना सरकार आर्थिक मदत करते. अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, प्रधानमंत्री ज्ञानवीर योजनेअंतर्गत (PM Gyanveer Yojana) दरमहा 3400 रुपये दिले जाणार आहेत. (Central Government Scheme Pm Gyanveer Yojana Get 3400 Rupees Per Month)

पीआयबीने वस्तुस्थिती तपासली

या मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी पीआयबीने फॅक्ट चेक केले आहे. याशिवाय पीआयबीने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर या पोस्टची माहिती दिली आहे. या मेसेजचे सत्यता काय आहे ते जाणून घेऊया...

पीआयबीने ट्विट केले

पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, 'व्हायरल पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की प्रधानमंत्री ज्ञानवीर योजनेंतर्गत नोंदणी केल्यावर, तरुणांना दरमहा ₹ 3400 दिले जातील.'

दुसरीकडे, हा दावा खोटा असून अशा कोणत्याही वेबसाइट/लिंकवर तुमची वैयक्तिक माहिती शेअर करु नका. त्याचबरोबर असे मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी #FactCheck नक्की करा.

बनावट पोस्टपासून सावध रहा

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या अशा मेसेजपासून प्रत्येकाने सावध राहावे, असे पीआयबीने म्हटले आहे. पीआयबीने नागरिकांना (Citizens) असे मेसेज फॉरवर्ड न करण्यास सांगितले आहे.

व्हायरल मेसेजची फॅक्ट चेक करता येईल

असा कोणताही मेसेज तुमच्यापर्यंत आल्यास, तुम्ही त्याची सत्यता जाणून घेण्यासाठी फॅक्ट चेक करु शकता. तुम्ही PIB द्वारे तथ्य तपासणी करु शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकला भेट द्यावी लागेल. याशिवाय, तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप नंबर +918799711259 किंवा ईमेल: pibfactcheck@gmail.com वर व्हिडिओ पाठवू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT